Anjali Arora : कानपूरमधील इव्हेंटचा वाद अंजली अरोराला महागात पडणार? आयोजकांनी मागितली 1.20 कोटींची भरपाई

Anjali Arora : सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री अंजली अरोरा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. कानपूर इव्हेंटमध्ये झालेल्या वादानंतर ऑर्गनायझरनी अंजलीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

Anjali Arora : कानपूरमधील इव्हेंटचा वाद अंजली अरोराला महागात पडणार? आयोजकांनी मागितली 1.20 कोटींची भरपाई
| Updated on: Oct 23, 2026 | 6:35 PM

Anjali Arora: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री अंजली अरोरा हिचा कानपूरमधील एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाला आणि ती चर्चेत आली. त्यावरून बराच वादही झाला. आता यानंतर अंजली ही कायदेशीर अडचणीत सापडल आहे. खरंतर अंजली ही कानपूरमध्ये एका इव्हेंटसाठी गेली, तिथे जेव्हा ती स्टेजवर पोहोचली, तेव्हा डीजेने तिचं, प्रसिद्ध कच्चा बादाम हे गाणं लावलं. मात्र ते गाणं ऐकतचा अंजली चांगलीच नाराज झाली आणि डीजेशी बोलोयला मागे वळली. त्यानंतर इव्हेंटच्या आयोजकांनी तिच्यावर पब्लिसिटी स्टंट करण्याचा आणि कार्यक्रम खराब केल्याचा आरोप लावला. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला.

इतकंच नाही, तर कार्यक्रमाच्या आयोजकांनी अंजली अरोराला कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली होती. आता आयोजकांनी प्रत्यक्षात तिच्याविरोधात पाऊल उचललं आहे. हो, हे खरं आहे. कार्यक्रम अर्धवट सोडून गेल्यामुळे आयोजकांनी अंजली अरोराला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये 1.20 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, 15 दिवसांच्या आत सार्वजनिकरीत्या माफी मागाव, असंही सांगण्यात आलं आहे.

Loading...

अंजली अरोराच्या अडचणी वाढल्या

‘अमर उजाला’च्या रिपोर्नुसार, आयोजकांनी अंजलीकडे मानहानीसाठी 1 कोटी रुपये आणि कार्यक्रमादरम्यान झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून 20 लाख रुपये मागितले आहेत, असं वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितलं. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, इव्हेंटमध्ये आलेल्या अंजलीने त्यां मंचावर 45 मिनिटं उपस्थित राहणं अपेक्षित होतं. तसेच, तिच्या आणि प्रायोजकांच्या हस्ते खास पाहुण्यांना स्मृतिचिन्हंही प्रदान करण्यात येणार होती. मात्र, अंजली कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्यामुळे पाहुण्यांना वाईट वाटलं आणि आयोजकांचं आर्थिक नुकसान झालं, असा दावा करण्यात आला आहे.

अंजलीला किती रक्कम मिळाली होती ?

आयोजकांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी अंजली अरोराला 3 लाख रुपये देण्यात आले होते. याशिवाय, तिच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेवर 1 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता. दरम्यान, या कायदेशीर नोटीशीवर अंजली अरोराने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us