Ankita Lokhande: यांचं अजूनही पटत नाही..; अंकिता लोखंडे उषा नाडकर्णींच्या पाया पडायला गेली पण.. पुढे जे घडलं ते पाहून नेटकरी चकीत

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता उषा यांच्या पाया पडायला जाते, मात्र त्यानंतर पुढे जे होतं, ते पाहून नेटकरीसुद्धा चकीत झाले आहेत.

Ankita Lokhande: यांचं अजूनही पटत नाही..; अंकिता लोखंडे उषा नाडकर्णींच्या पाया पडायला गेली पण.. पुढे जे घडलं ते पाहून नेटकरी चकीत
Ankita Lokhande and Usha Nadkarni (PC- Voompla)
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2026 | 1:30 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या मालिकेत दोघींनी सासू-सुनेची भूमिका साकारली होती. मालिकेतील त्यांच्या नात्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. मात्र, आता एका सेलिब्रिटीच्या रिसेप्शन पार्टीतील त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता उषा नाडकर्णी यांच्या पाया पडण्यासाठी पुढे जाताना दिसते. मात्र, उषा नाडकर्णी तिला ‘बाय-बाय’ म्हणत पुढे निघून जातात. यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका सेलिब्रिटीच्या रिसेप्शन पार्टीत अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांची भेट झाली. कार्यक्रम संपल्यानंतर दोघीही बाहेर पडताना दिसल्या. त्यावेळी अंकिता उषा नाडकर्णी यांच्याशी काहीतरी बोलताना आणि त्यांचा निरोप घेताना दिसते. याचदरम्यान अंकिता पटकन त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकते. मात्र, उषा नाडकर्णी तिला ‘बाय-बाय’ म्हणतात आणि तिथून पुढे निघून जातात. पापाराझींनी शूट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील या काही क्षणांमुळे दोन्ही अभिनेत्रींमध्ये नेमकं काय घडलं, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मालिकेत सासू-सुनेच्या भूमिकेत दिसलेल्या या दोघींना पुन्हा एकत्र पाहिल्याने ‘पवित्र रिश्ता’च्या चाहत्यांच्या जुन्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.

Loading...

पहा व्हिडीओ-

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ‘सासूबाईंनी सुनेला ढकललं’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने अंकिता बळजबरीने उषा नाडकर्णी यांच्या पाया पडायला गेली, मात्र त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, असं म्हटलं. काही नेटकऱ्यांनी तर ‘अजूनही सासू-सुनेचं पटत नाहीये’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेतील त्यांच्या नात्याची आठवण करून देत अनेकांनी या प्रसंगाकडे विनोदी पद्धतीने पाहिलं आहे. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी साकारलेली सुलोचना ताईंची भूमिका विशेष गाजली होती. त्यांच्या अभिनयामुळे व्यक्तिरेखेला वेगळी ओळख मिळाली. आजही या मालिकेतील कलाकारांना एकत्र पाहिल्यानंतर प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. त्यामुळे अंकिता आणि उषा नाडकर्णी यांच्या भेटीचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us