अनुराग कश्यप करणार तिसरे लग्न? 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला करतोय डेट

Anurag Kashyap: बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

अनुराग कश्यप करणार तिसरे लग्न? 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला करतोय डेट
अनुराग कश्यप
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 15, 2026 | 2:54 PM

बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे ब्रेकअप, लव्हअफेअर, लग्न आणि घटस्फोट याविषयी प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. अभिनेता अमिर खानने काही दिवसांपूर्वीच तिसरे लग्न केले. त्यानंतर आता सध्या बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच चर्चेत आहे. तो देखील 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला डेट करत असल्याचे समोर आले आहे.

अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टी गेल्या ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमध्ये २०-२१ वर्षांचे अंतर आहे. अनुराग ५३ वर्षांचा आहेत तर शुभ्रा ३० वर्षांची आहे. आता अनुराग आणि शुभ्रा यांनी एकत्र त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांना एज शेमिंगचा सामना कसा करावा लागला आणि अनुराग यासाठी कसा लढला.

दोघांच्या रिलेशनबद्दल अनुराग-शुभ्रा यांनी सांगितले

अनुराग आणि शुभ्रा आता बंगळुरूमध्ये एकत्र राहतात. शुभ्रा यांनी जेनिस सिक्किरिया यांच्या युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हटले की, ‘आम्ही हे खूप लो-प्रोफाइल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही पार्ट्या आणि इव्हेंट्समध्ये जायचो, पण मीडियापासून दूर राहून. पण नंतर एका आंटी जर्नालिस्टने ही बातमी शेअर केली.’

शुभ्राच्या पालकांची प्रतिक्रिया कशी होती

जेव्हा शुभ्राला विचारले गेले की तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, तेव्हा ती म्हणाली की, ‘माझ्या आईला आता वाटते की अनुराग तिच्या पत्नीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पतीसारखे आहे. पण जर मी आई असते आणि माझी २० वर्षांची मुलगी ४० वर्षांच्या माणसाला डेट करत असती, ज्याला मूलही आहेत, तर मी कशी प्रतिक्रिया दिली असती? मला वाटते माझ्या पालकांनी चांगले केले.’

दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली

त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना शुभ्रा म्हणाली की, ‘इथे जनरेशन डिफरन्स फ्लिप झाला आहे. अनुराग मला म्हणाला की तो माझ्यावर प्रेम करतो आणि मी फ्लिप झाले. अनुराग मला म्हणाला की मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते. कारण तुम्हाला अजून आयुष्यात खूप काही पाहायचे आहे आणि मी खूप काही पाहिले आहे. जेव्हा मी आय लव्ह यू म्हणतो तेव्हा मला माहीत आहे मी काय म्हणतोय. अनुरागने मला वेळ घेण्यासाठी सांगितले होते.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us