Asha Bhosale : आशा भोसले यांची प्रकृती आता कशी ? डॉक्टरांनी काय सांगितलं, नवी अपडेट काय ?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना बरं वाटत नसल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. सुरुवातीला थकवा आणि छातीत संसर्ग असल्याचे सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांनी प्रकृतीबाबत अपडेट्स दिले आहेत. आता हृदयविकाराची पुष्टी केली आहे. त्यांच्या प्रकृतीची सर्वांना चिंता असून, पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या शीघ्र बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. आशाताईंच्या आरोग्यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

Asha Bhosale : आशा भोसले यांची प्रकृती आता कशी ? डॉक्टरांनी काय सांगितलं, नवी अपडेट काय ?
आशा भोसले यांची प्रकृती आता कशी ?
Image Credit source: social media
| Updated on: Apr 12, 2026 | 12:29 PM

मराठी तसेच हिंदीसह अनेक भाषांत लीलया गाणं गाणाऱ्या, प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांना बरं नसून रुग्णालयात दाखल करण्याचं वृत्त समोर आल्यावर काल सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सगळेच काळजीत होते, चिंता वाटू लागली. मात्र त्यानंतर काही वेळातच, त्यांची नात झनाई भोसले हिने तिच्या आजीबद्दल, प्रकृतीबद्दल अपडेट शेअर केली होती. ‘माझी आजी, आशा भोसले यांना थकवा आणि छातीत संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा ही विनंती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. आम्ही लवकरच सकारात्मक अपडेट देऊ.’ असं जनाईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

आता शनिवारी, आशा भोसले यांची प्रकृती कशी, त्यांची तब्येत सुधारते आहे का याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून आशा भोसले यांच्याबद्दल आणखी काही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, पण त्यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्या ब्रीच कँडीमधील डॉक्टर समदानी यांनी आशा भोसले यांच्या तब्येतीबद्दल लेटेस्ट माहिती दिली.

Loading...

 

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील फिजिशियन (वैद्यकीय तज्ज्ञ) डॉ. प्रतीती समदानी यांनी आशा भोसलेंच्या प्रकृतीबसंदर्भात अपडेट्स दिले. आशा भोसले यांना काला, शनिवार 11 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना खरोखरच हृदयविकाराचा झटका आला होता , असं त्यांनी म्हटल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

पीएम मोदींनी केलं ट्विट

दरम्यान आशा भोसले यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी सर्व चाहते प्रार्थना करत असून भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीही रुग्णालयात जाऊन आशा भोसलेच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. तसेच पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट लिहीत आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. ‘आशा भोसलेजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ऐकून मी अत्यंत चिंतेत आहे’, असं मोदींनी लिहिलं. त्यांनाबरं वाटावं, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीही मोदींनी प्रार्थना केली.

 

दरम्यान इतर अनेक सेलिब्रिटींनीही आशा भोसले यांना बर वाटावं यासाठी प्रार्थना केली आहे. अभिनेता अभिजीत केळकरने आशा भोसलेंसाठी पोस्ट केली.

 

1948 साली कारकिर्दीची सुरूवात केलेल्या आशा भोसले यांनी आत्तापर्यंत हजारो गाणी गायली आहेत. चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे त्यांचं पहिलं गाणं होतं. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन अशा भाषांमधून 1600 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us