19 वर्षांपूर्वीच्या गाण्याची आजही क्रेझ ! श्रेया घोषालच्या आवाजाने जिंकलं मन, करीना कपूरच्या डान्सने लावलं वेड! ‘हा ’खास किस्सा माहिती आहे का ?

19 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्यात करीना कपूरने शिमलातील तरूणी साकारत केला होता जबरदस्त डान्स. मनालीच्या निसर्गरम्य परिसरात शूट झालेल्या या गाण्याला श्रेया घोषालने आवाज दिला आणि हे गाणं सुपरहिट बनलं.

19 वर्षांपूर्वीच्या गाण्याची आजही क्रेझ ! श्रेया घोषालच्या आवाजाने जिंकलं मन, करीना कपूरच्या डान्सने लावलं वेड! ‘हा ’खास किस्सा माहिती आहे का ?
| Updated on: Oct 16, 2026 | 8:17 PM

हिंदी सिनेमात अशी अनेक गाणी आहेत, जी कानावर पडताच, एखाद्या जागेच्या आठवणी ताज्या होतात. आज आपण अशाच एक, 19 वर्षांपूर्वीच्या गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे डोंगर, दऱ्या, सुंदर वातावरण आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या एका चुलबुल्या तरूणीची आठवण येते. 2007 साली रिलीज झालेल्या या चित्रपाटत गीत नावाची मुलगी, एका मुलाच्या प्रेमात वेडी असते आणि त्याच प्रेमासाठी ती घर सोडून येतं. अतिशय स्वच्छंदीपणे, मनमोकळेपणे आपलं आयुष्य जगणारी ही मुलगी.. तिच्यावरच शूट झालेलं हे गाण ज्यात रंगीन अंदाज,बर्फाने भरलेले डोंगर, आणि तिचा पहाडी डान्स, आजही कित्येकांच्या लक्षात असेल. पण हे गाणं कोणामुळे अविस्मरणीय ठरलं हे माहीत आहे ? चला मग जाणून घेऊया…

चुलबुली गीतचा डान्स

Loading...

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत. या चित्रपटात करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याच चित्रपटातील ‘ ये इश्क हाए, बैठे बिठाए, जन्नत दिखाए’ हे गाणं विख्यात नृत्यदिग्दर्शिका, सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. या गाण्याचे चित्रीकरण मनालीच्या आसपासच्या सुंदर निसर्गरम्य परिसरात करण्यात झालं. चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण शिमला आणि रोहतांग पास येथेही करण्यात आलं होतं.

या सुंदर या गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं, तर इरशाद कामिल यांनी त्याचे बोल लिहिले होते. श्रेया घोषाल हिने तिच्या सुमधुर आवाजात हे गाणं गायलं. या गाण्यात करीना कपूर रंगीबेरंगी, पारंपरिक हिमाचली वेशभूषेतही दिसली होती. या गाण्याचे बोल, सुंदर लोकेशन्स, संगीत आणि श्रेया घोषाल हिचा मधुर आवाज यांसोबतच करीनाचा आकर्षक लूक आणि तिच्या चुलबुल्या अंदाजामुळे हे गाणं विशेष लोकप्रिय झाले.

असे होते गाण्याचे बोल –

हाँ है कोई तो वजह
जो जीने का मज़ा
यूँ आने लगा
ये हवाओं में है क्या
थोड़ा सा जो नशा
यूँ छाने लगा
पूछो न पूछो मुझे क्या
हुआ है तेरी राहों में आकर
(पूछो न पूछो ना)
पूछो न पूछो मुझे क्या
मिलेगा तेरी बाहों में आकर
ये इश्क हाय बैठे बिठाये
जन्नत दिखाए हाँ, ओ रामा
ये इश्क हाय बैठे बिठाये
जन्नत दिखाए हाँ

नृत्य न करणाऱ्या कलाकारांचाही समावेश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याचं शूटिंग मनालीच्या आसपासच्या सुंदर निसर्गरम्य भागात करण्यात आलं होतं. या गाण्यात स्थानिक नर्तक आणि स्थानिक रहिवाशांचाही समावेश करण्यात आला होता. यामध्ये चंबा, बिलासपूर, किन्नौर, धर्मशाळा, हमीरपूर आणि कुल्लू येथील स्थानिक नृत्यगट सहभागी झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सांगितलं होतं की, सरोज खान यांनी या नर्तकांसोबत सातत्याने सराव केला होता. त्यांच्या नृत्याने आनंदित होऊन सरोज खान यांनी त्यांना चॉकलेट्सही वाटली होती.

या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी सरोज खान यांना 2008 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते. गाण्यातील करीनाचे रंगीबेरंगी कपडे आणि स्थानिक नर्तकांची पारंपरिक वेशभूषा यांमुळे हिमाचल प्रदेशातील पहाडी संस्कृती आणि निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

गाण्याशी निगडीत खास किस्सा

ये इश्क हाए – हे गाणं श्रेया घोषालने तिच्या सुमधुर आवाजाने अविस्मरणीय केलं. याशिवाय, IMDb नुसार, या गाण्याच्या संगीताची तुलना इंडोनेशियन गायिका अंग्गुन यांच्या फ्रेंच गाण्याशी ‘Être une femme’ अशीही करण्यात आली होती. मात्र, प्रीतम यांनी सांगितलं की, त्यांना या गाण्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. हा केवळ एक योगायोग असू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

इम्तियाज अली यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्याशिवाय तरुण अरोरा आणि सौम्या टंडन हे कलाकारही दिसले होते. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात सुमारे 50.94 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तो हिट ठरला होता. मात्र शाहिद आणि करीना हे काही चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हते. आधी या भूमिकेसाठी बॉबी देओल आणि आयेशा टाकियाची निवड करण्यात आली होती, असं सांगितलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us