Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठं एव्हिक्शन, कमी मतांनी पलटवला गेम; या स्पर्धकाचा प्रवास संपला ?

  Bigg Boss 20 मध्ये वादावादी आणि गदारोळादरम्यान एव्हिक्शनच्या खेळात नवा ट्विस्ट आला. प्रेक्षकांची मतं कमी मिळाल्यामुळे यंदा एका स्पर्धकाला घरातून बाहेर पडाव लागलं, मात्र ती व्यक्ती बाहेर जाताच आणखी एक नवं वळण आलं.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठं एव्हिक्शन, कमी मतांनी पलटवला गेम; या स्पर्धकाचा प्रवास संपला ?
| Updated on: Oct 17, 2026 | 7:21 PM

‘बिग बॉस 20′ च्या घरात पुन्हा एक असा मुद्दा समोर आलाय, ज्यामुळे स्पर्धकांचा आपापसातील वाद वाढला आहे. मात्र यावेळी चर्चा झाली ती नकुल धुल आणि अमन गांधी यांच्यातील वक्तव्यामुळे. मुंबई, महिला सुरक्षा आणि LGBTQIA+ समुदायाचा स्वीकार यांसारख्या मुद्यांवरून चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वाद सुरू झाला. मात्र हळूहळू ही चर्चा अमनच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली, जेव्हा नकुलने त्याला त्याच्या लैंगिकतेबद्दल प्रश्न विचारले. या संवादामुळे घरातलं वातावरण असहज झालं. त्यातच आता शो शी निगडीत चर्चांमध्ये अमन गांधीचं एव्हिक्शन आणि नकुलच्या वापसीबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.

अमनच्या सेक्शुॲलिटीवरून नकुलने विचारला प्रश्न

Loading...

रिपोर्ट्सनुसार, या संभाषणादरम्यान नकुल धुलने अमन याला तो स्ट्रेट आहे का, असं विचारलं. त्यावर उत्तर देताना अमन याने आपण स्ट्रेट असल्याचं सांगितलं. त्यानंतर नकुलने समलैंगिक व्यक्तींबद्दल त्याचं काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, अमन कधी एखाद्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकेल का, असा प्रश्नही त्याने विचारला. सुरुवातीला LGBTQIA+ समुदायाकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर चर्चा सुरू होती. मात्र, पुढे या चर्चेचे रूपांतर अमनच्या वैयक्तिक आयुष्या बद्दलच्या प्रश्नांमध्ये झालं. या दरम्यान नकुलने ‘होमोफोबिक’ या शब्दाचाही वापर केला. या संभाषणामुळे दोघांमधील तणाव वाढला आणि हा विषय चर्चेत आला.

कोण आहे नकुल धुल ?

नकुल धुल हा हरियाणातील फरिदाबाद येथील रहिवासी आहे. सोशल मीडियाच्या जगात तो ‘मिठ्ठू डॉन’ या नावाने ओळखला जातो. तो डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडकपणे आपलं मत मांडण्याच्या शैलीमुळे त्याने इंटरनेटवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नकुलची शैक्षणिक पार्श्वभूमी इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. मात्र, पारंपरिक नोकरी करण्याऐवजी त्याने कंटेंट क्रिएशनचा मार्ग निवडला. सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करणे, लाइव्हस्ट्रीम करणे आणि लोकांशी संवाद साधणे, या माध्यमांतून त्याने स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला. ‘बिग बॉस 20’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना त्याचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले.

अमन गांधी बेघर, नकुलच्या वापसीबद्दलही सवाल

दुसरीकडे, अमन गांधी याला शोमधून बाहेर पडावं लागल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमी मते मिळाल्यामुळे त्याला घर सोडावं लागलं. मात्र, त्याच्या एलिमिनेशनबाबतच्याअजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नकुल धुलबद्दलही आधी अशाच बातम्या समोर आल्या होत्या की घरातून बाहेर पडल्यावर तो परत येऊ शकतो. पण सध्या त्याच्या वापसीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे येत्या भागात काय होतं, हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us