तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. राकेश बापटने रुचिता जामदारवर मोठा आरोप केला आहे. या दोघांमधील वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर...
Ruchita Jamdar and Raqesh Bapat
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2026 | 12:40 PM

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. सोशल मीडियापासून लोकल ट्रेन्सपर्यंत या शोच्या एपिसोड्सची चर्चा होतेय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी ‘बीबी पापड फॅक्ट्री’ हा टास्क घरातील स्पर्धकांमध्ये खेळला गेला. याच टास्कदरम्यान राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात मोठा वाद झाला. रुचिता टास्कदरम्यान माझ्या अंगावर धावून आली आणि तिने मला चुकीचा स्पर्श केला, असा धक्कादायक आरोप राकेशने केला आहे. इतकंच नव्हे तर रुचिता नेमकं कशी वागली, हे जेव्हा राकेश सांगत होता तेव्हा प्रायव्हसीच्या कारणास्तव काही संवाद बीप करण्यात आले.

टास्कदरम्यान रुचिताच्या वागण्यावर राकेश चांगलाच चिडला होता. रागाच्या भरात तो थेट बेडरुममध्ये निघून गेला. त्यानंतर राकेशने दिपालीला याबद्दल सांगितलं. राकेश आणि दिपाली यांच्यात झालेल्या संवादावरून रुचिताने घरात मोठा वाद घातला. अखेर दिपालीने तिला सर्वकाही राकेशसमोर बोलून वाद मिटव, असा सल्ला दिला. पण रुचिता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर विशालने यात मध्यस्थी केली आणि सगळेजण राकेशजवळ बोलायला गेले.

रुचिताबद्दल राकेशच्या मनात राग अजूनही कायम आहे. “मी टास्कदरम्यान तिला सांगत होतो की माझ्याजवळ येऊ नकोस. तरी ती माझं ऐकत नव्हती, ती तिच्या अग्रेशनमध्ये खेळत होती. मला आता या गोष्टीवर अजिबात बोलायचं नाहीये. मी जे काही बोलेन ते थेट भाऊच्या धक्क्यावर बोलेन. तिथेच याबद्दल चर्चा होईल”, असा इशारा राकेश देतो. त्यानंतर रुचिता आणि विशाल तिथून निघून जातात. हे दोघं गेल्यावर राकेश कॅमेराजवळ बघून म्हणतो, “मला विशाल आणि रुचिताचं थोबाडसुद्धा बघायचं नाही. ते दोघंही मूर्ख आहेत.”

यानंतर वॉशरुम एरियामध्ये प्राजक्ता शुक्रे आणि इतर सदस्यांशी बोलताना राकेश पुन्हा या विषयावर व्यक्त होतो. तो पुढे म्हणतो, “मला सगळं नीट आठवतंय. रुचिता माझ्या अंगावर येत होती. मला धक्का लागला होता. मी खरंच याविषयी भाऊच्या धक्क्यवर बोलणार आहे.” त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष आता भाऊचा धक्का एपिसोडवर लागून आहे. राकेश रितेशला रुचिताबद्दल काय सांगणार आणि त्यावर रितेशची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us