Bipasha Basu: लेकीसोबत बिपाशा बासूचे फोटो आले समोर

बिपाशा बासूला रुग्णालयातून डिस्चार्ज; लेकीसोबत फोटोसाठी दिले पोझ

| Updated on: Nov 15, 2022 | 3:13 PM
1 / 5
अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 12 नोव्हेंबर 2022 रोजी बिपाशाने मुलीला जन्म दिला.

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 12 नोव्हेंबर 2022 रोजी बिपाशाने मुलीला जन्म दिला.

2 / 5

बिपाशाने तिच्या मुलीचं नावसुद्धा जाहीर केलं आहे. देवी बासू ग्रोवर असं नाव त्यांनी बाळाला दिलं आहे. मंगळवारी बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

3 / 5

चिमुकल्या मुलीसोबत बिपाशाचे फोटो समोर आले आहेत. रुग्णालयातून घरी येताना बिपाशा आणि करणने बाळासोबत पापाराझींसाठी पोझ दिले.

4 / 5

'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करणमध्ये मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 30 एप्रिल 2016 मध्ये करण आणि बिपाशाने लग्न केलं.

5 / 5

वयाच्या 43 व्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. बेबी बंप फ्लाँट करत तिने फोटोशूटसुद्धा केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us