अभिनेता अजय देवगण याला मोठा दणका, थेट बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा, बीएमसीने..
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. थेट महापालिकेने अजय देवगण याला दणका दिला. अजय देवगण याच्या घरावर हातोडा महापालिकेकडून चालवण्यात आला. थेट कारवाई करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अजय देवगण याला एफडीएकडून थेट नोटीस पाठवण्यात आली. पान मसाल्याची जाहिरात केल्याने अजय देवगण अडचणीत असतानाच बीएमसीकडून त्याला मोठा दणका देण्यात आला. अजय देवगण यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीचा हातोडा चालवला आहे. थेट मोठा दणकाच दिला. नोटीस देऊनही काम न थांबवल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात आली. अगोदर पालिकेने यासंदर्भात अजय देवगण याला नोटीस दिली होती. मात्र, नोटीस देऊनही अजय देवगण याच्याकडून काम थांबवण्यात आले नाही. अखेर थेट कारवाईच करण्यात आली. अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली.
पालिकेने काम थांबवण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेने बंगल्यातील काही बांधकाम पाडले आहे. अजय देवगण यांचा जुहू येथील कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यातील अंतर्गत बदल, विभाजनाच्या भिंती, खिडक्या आणि इतर कामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप आहे. कोणतीही परवानगी नसताना हे बांधकाम सुरू होते.
याबाबत नोटीसही महापालिकेकडून देण्यात आली. पण महापालिकेच्या या नोटीसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा अजय देवगण याच्याकडून देण्यात आला नाही. शेवटी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354A अंतर्गत नोटीस बजावली होती. हे काम थांबवावे, असे स्पष्ट शब्दात पालिकेने नोटीसमध्ये स्पष्ट केले.
काम तातडीने थांबवून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटिशीनंतरही काम सुरू राहिल्याने पालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. महापालिकेने नोटीस देऊनही काम सुरूच ठेवण्यात आले होते. शिवाय कोणत्याही प्रकारची परवान्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली नाही. शेवटी महापालिकेने कारवाई सुरू केली. अजय देवगण या बंगल्यात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. अजयने बांधकामासाठी परवाना घेतला नसल्याचा आरोप आहे. एफडीएच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा अजय देवगण चर्चेत आला.