Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भेटीला आमिर खान तिसऱ्या पत्नीसह शिवतिर्थावर, कारण…

Raj Thackeray : नुकताच अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्राट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी 'शिवतिर्थ' येथे पोहोचले. सध्या सर्वत्र त्यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भेटीला आमिर खान तिसऱ्या पत्नीसह शिवतिर्थावर, कारण...
Raj Thackeray - Aamir Khan
| Updated on: Oct 18, 2026 | 2:38 PM

Raj Thackeray : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्राट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतिर्थ’ येथे पोहोचले होते. मात्र या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे… भेटी दरम्यान नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाल्या याबद्दल देखील काही कळू शकलेलं नाही. पण त्यांच्या भेटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी देखील आमिर अनेकदा राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेला. पण आता अभिनेता तिसऱ्या पत्नीसोबत पोहोचल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा आमिर खान, राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचला आहे, अनेक कार्यक्रमांमध्ये देखील आमिर खान आणि राज ठाकरे यांना एकत्र पाहण्यात आलं आहे.

 राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नात देखील राज ठाकरे उपस्थित होते. आमिर खान याने 5 जुलै, 2026 रोजी मुंबईत राहत्या घरी विशेष विवाह कायद्याअंतर्गत गौरी हिच्यासोबत लग्न केलं. या लग्नात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचाही हजेरी लावलेली. भर पावसात राज ठाकरे आमिर खानच्या लग्नाला पोहोचले असून त्याचा फोटो समोर आलेला.

Loading...

 

राज ठाकरे, आमिर खान याच्या लेकीच्या लग्नात आलेले. याआधी ईदच्या निमित्तानेही राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमिर खानच्या घरी भेट दिली होती. तेव्हा भेटीनंतर राज ठाकरे यांना घराबाहेर सोडण्यासाठी आमिर खान अनवाणी आलेला. त्यांच्या त्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले.

आता आमिर खान तिसऱ्या पत्नीसोबत राज ठाकरे यांच्या भेटीला का पोहोचला? याबद्दल चर्चा रंगल्या आहे. आमिर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिला पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिर याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत आमिर याने तिसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि  व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले.

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us