गोविंदाने लालबागच्या राजासमोर झटकला कथित गर्लफ्रेंडचा हात, व्हिडीओ व्हायरल, थेट..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी त्याच्यावर आरोप करत आहे. त्यात गोविंदा आता नुकताच लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला. मात्र, यावेळी त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंडसोबत होते.

गोविंदाने लालबागच्या राजासमोर झटकला कथित गर्लफ्रेंडचा हात, व्हिडीओ व्हायरल, थेट..
Bollywood actor Govinda
| Updated on: Sep 23, 2026 | 7:02 AM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. गोविंदा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा याची पत्नी सुनिता आहुजा सतत गंभीर आरोप करत आहे. यासोबत कोर्टात घटस्फोटासाठी तक्रार दाखल केली, त्यानंतर ती परत घेण्यात आली. गोविंदाचे नाव एका नवख्या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. हेच नाही तर गोविंदा तिच्यासोबतच राहत असल्याचाही सातत्याने दावा केला जात आहे. कोमल राणी हिच्यासोबत अनेकदा गोविंदा स्पॉट होताना दिसला. यावेळी सुनिता आहुजा आपल्या मुलांसोबत गणपती बाप्पाचे स्वागत करताना दिसल्या. मात्र, त्यावेळी गोविंदा नव्हता. आता गोविंदा नुकताच मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. पत्नी सुनिता हिच्यासोबत नाही तर गोविंदा कथित गर्लफ्रेंडसोबत गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला.

पत्नी असताना हिच्यासोबत यायची काय गरज असल्याचे यादरम्यान अनेकांनी म्हटले. चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडिओमध्ये गोविंदा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे. त्याच्यासोबत पत्नी सुनीता आहुजाऐवजी त्याची कथित गर्लफ्रेंड दिसत आहे. सुनीता आहुजासोबतच्या संबंधांत दुरावा आल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच गोविंदाचे नाव अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी जोडले जात आहे.

यावेळी दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओत गोविंदा कोमल राणी हिची काळजी घेताना दिसतोय. काळजीने तिला घेऊन जात आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये कोमल राणी ही पुढे गेटमधून बाहेर येते मागे गोविंदा दिसतोय. यादरम्यान थेट गोविंदाचा हात पकडताना कोमल राणी दिसली.

हे पाहताच गोविंदाने थेट कोमल राणी हिच्या हाताला झटका दिला आणि आपला हात मागे घेतला. कदाचित सर्व कॅमेरे आपल्यावरच असल्याचे लक्षात आल्याने तात्काळ गोविंदाने हाताला झटका दिला. गोविंदा आणि कोमल राणी यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून जोडले जात आहे. मात्र, यावर गोविंदाने काहीच भाष्य केले नाही. सुनिता आहुजा आरोप करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us