सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहीण श्वेताने शेअर केला इमोशनल व्हीडिओ, चाहते म्हणाले…
मुंबई: बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने (shweta singh kirti) एक इमोशनल व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर […]

मुंबई: बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने (shweta singh kirti) एक इमोशनल व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर सुशांतचे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. ‘आजही तुझी आठवण येते. मिस यू सुशांत…’ अश्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
श्वेता सिंग किर्तीची इन्स्टाग्राम पोस्ट
सुशांतचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंग किर्तीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हीडिओ शेअर केला आहे. ‘माय गॉड! हा किती सुंदर व्हीडिओ आहे. माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा… आम्ही तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सुशांतच्या टीमने हा सुंदर व्हीडिओ बनवला, तुमचे खूप खूप आभार.’ असं श्वेताने या व्हीडिओसाठी कॅपशन लिहिलं आहे.
व्हीडिओवर सुशांतच्या चाहत्यांची प्रतिक्रिया
सुशांतसाठी बनवलेला हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूप भावूक होताना पहायला मिळत आहेत. ‘सुशांत, आजही तुझी आठवण येते. आज तु असतास तर आणखी दर्जेदार सिनेमे बॉलीवूडला मिळाले असते.’ अश्या भावूक कमेंट या व्हीडिओवर पहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सुशांत सिंग राजपूतने एम. एस. धोनी केदारनाथ, छिछोरे, शुद्ध देसी रोमान्स, राबता, पी.के, काय पो चे या सिनेमांमध्ये सुशांतने काम केलं. दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला.
सुशांत सिंग राजपूतचा 14 जून 2020 ला मृत्यू झाला. त्यावेळीही त्याचे चाहते भावूक झाले होते. आज त्याच्या वाढदिवशीही सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट पहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या