gehraiyaan movie : दीपिका पादुकोणचा ‘तो’ बोल्ड अंदाज पती रणवीर सिंगलाही आवडला, ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर पाहून म्हणाला…

gehraiyaan movie : दीपिका पादुकोणचा 'तो' बोल्ड अंदाज पती रणवीर सिंगलाही आवडला, 'गेहराईयाँ'चा ट्रेलर पाहून म्हणाला...
रणवीर सिंग, दीपिका पादुकोण

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (deepika padukon) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट गेहराईयाँचा ट्रेलर (gehraiyaan movie trailer) प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावर दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुडी, सेक्सी’, अशी कमेंट रणवीरने केली आहे. रणवीर सिंगची इन्स्टाग्राम पोस्ट गेहराईयाँ या दीपिकाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यावर रणवीर […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 21, 2022 | 11:30 AM

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (deepika padukon) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट गेहराईयाँचा ट्रेलर (gehraiyaan movie trailer) प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावर दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुडी, सेक्सी’, अशी कमेंट रणवीरने केली आहे.

रणवीर सिंगची इन्स्टाग्राम पोस्ट

गेहराईयाँ या दीपिकाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यावर रणवीर सिंगने इंन्स्टाग्रामवर दीपिकाचा एक फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाचं हे काम आपल्याला आवडलं. या सिनेमात तिने तिचं पात्र ती उत्तमरित्या साकारलं आहे. तिच्या पात्राला साजेसं ती सेक्सी दिसत असल्याचं रणवीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. 20 तासात हा ट्रेलर 10 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या सिनमात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार

गेहराईयाँ हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सिनेरसिकांचा ट्रेलर रिव्ह्यू

दीपिका बॉलिवूडच्या टॉप 5 अभिनेत्री पैकी एक आहे. तिच्या चाहत्यांना दीपिकाच्या नव्या कामाविषयी नेहमीच आदर वाटतो. तिच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे, अशा प्रतिक्रिया या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये पहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीची सर्वात मोठी भूमिका

10 वर्षात 70 सुपरहिट सिनेमे, 2 वर्षांनी लहान शम्मी कपूरशी लग्न, अभिनेत्री गीता बाली यांची जीवनकहानी जाणून घ्या…

Viral Post of Salman Khan | भाईजानच्या पोस्टने चाहते गोंधळले! सलमान खान उद्या नेमकं काय शेअर करणार आहे?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें