Viral Post of Salman Khan | भाईजानच्या पोस्टने चाहते गोंधळले! सलमान खान उद्या नेमकं काय शेअर करणार आहे?

Viral Post of Salman Khan | भाईजानच्या पोस्टने चाहते गोंधळले! सलमान खान उद्या नेमकं काय शेअर करणार आहे?
सलमान खान
Image Credit source: Instagram

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सलमानने स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत भाईजान सलमान खान ग्रे टी-शर्ट घातल्याचं दिसतंय तर डोक्यावर गमछा बांधलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 20, 2022 | 9:14 PM

सलमान खान (Salman Khan) आपल्या चित्रपटांबद्दल आणि जाहिरातींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पण आता सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोंधळात टाकलंय. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram Post) सलमानने स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत भाईजान सलमान खानने ग्रे टी-शर्ट घातल्याचं दिसतंय तर डोक्यावर गमछा बांधलाय. फोटोसह सलमान त्याच्या आगामी सिनेमाबाबत काहीतरी नवी न्यूज देतोय, असं सुरुवातीला चाहत्यांना वाटलं. पण खरंतर सिनेमा नव्हे तर आणखी काहीतरी वेगळ्या गोष्टीची घोषणा तो लवकरच करणार आहे. वाढदिवसाआधी सर्पदंशामुळे सलमान खान चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्यावर लगेचच उपचारही करण्यात आले. दरम्यान, आता पूर्णपणे बरा झाल्यानंतर सलमान खाननं चाहत्यांना उद्देशून एक पोस्ट केली असून या पोस्टमध्ये एका नव्या गोष्टीचं कुतूहल वाढवलं आहे.

आज एक पोस्ट, उद्या एक टीजर…

सलमान खाननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, मी माझ्या अकाऊंटवरुन जाहिराती आणि ट्रेलरसारख्या गोष्टी तर शेअर करतत असतो. आपलाच ब्रॅन्ड आहे ना, कळलं का? मी ऐकतोय सगळं. पाहतोय. आज एक पोस्ट.. तर उद्या एक टीजर….

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

बुचकळ्यात टाकणारी पोस्ट सलमान खाननं केल्यामुळे चाहत्यांचाही गोंधळ उडाला आहे. उद्या नेमकं सलमान खान काय शेअर करणार आहे, अशी उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. आतापर्यंत सलमान खानच्या या फोटोला तबल्ल 9.33 लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. तर हजारो लोकांनी कमेंट करत सलमान खानच्या पोस्टबाबत कुतूहल व्यक्त केलंय.

चाहत्यांमध्ये उत्सुकता

सलमान खानचे वेगवेगळे चित्रपट सध्या रिलीजसाठी तयार आहेत. सलमान टायगर 3 मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरीना कैफही मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, टायगर थ्री सिनेमाचीही उत्सुकता असून मनीष शर्मा टायगर 3 चे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय सलमान लाल सिंग चड्ढा आणि पठाणमध्ये झळकणार आहे. लाल सिंग चड्ढा हा आमिर खानचा चित्रपट आहे. लाल सिंह चड्ढामध्ये करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सलमानने बजरंगी भाईजानचा सिक्वेल बनवणार असल्याची घोषणा केली होती. आता उद्या नेमका सलमान कोणती टीजर शेअर करतो, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये बघायला मिळतेय.

संबंधित बातम्या :

Gehraiyaan movie : दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 3 तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें