AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, अमेरिकेला ज्याची भीती तोच निर्णय घेतला, थेट इराणच्या सर्वाेच्च..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. संघर्ष टोकाला पोहोचला असून अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर तेहरान शहर आहे. इराणकडूनही मोठे हल्ले इस्त्रायल आणि आखाती देशांमध्ये केले जात आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली.

इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, अमेरिकेला ज्याची भीती तोच निर्णय घेतला, थेट इराणच्या सर्वाेच्च..
Supreme Leader Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 09, 2026 | 7:51 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाला आज 10 दिवस पूर्ण झाली आहेत. पुढील काही आठवडे युद्ध सुरू राहणार आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून ज्याप्रकारे मोठे हल्ले केले जात आहेत, त्या हल्ल्यानंतर जोरदार उत्तर इराणकडून दिले जात आहे. आखाती देशांमध्ये अमेरिकेने लावलेल्या रडार सिस्टम इराणकडून अगोदरच उद्ववस्थ करण्यात आल्या. यामुळे क्षेपणास्त्र नक्की कुठून येत आहे, याची माहिती मिळत नाही. इराणने सर्वात अगोदर ज्या ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले केले. यामुळे या युद्धात कुठेही अमेरिकेचे मोठे नुकसान झाले असून इस्त्रायलच्या प्रमुख ठिकाणांनाही इराणकडून टार्गेट करण्यात आले. तेल अवीवमध्ये इराणने हल्ले केले. अमेरिकेच्या टार्गेटवर आता इराणचे तेलसाठे आहेत. इराणच्या तेलसाठ्यांवर अमेरिका हल्ले करत असल्याने तेहरानमध्ये पाईपलाईनला मोठी आग लागल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष वाढला असतानाच आता इराणकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणकडून सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराणने माजी सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई याची निवड इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासन मोज्तबा खामेनेई याच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसली, त्यानंतर आता थेट नावाची घोषणा करण्यात आली.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये सर्वाेच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, अमेरिकेकडून मोज्तबा याच्या नावाला विरोध होता आणि आम्ही मोज्तबा याला सर्वाेच्च नेते मानत नसल्याचे अमेरिकेने यादरम्यान म्हटले होते. या निवडीमुळे कट्टरपंथी अजूनही तिथे खूप मजबूत आहेत, हे सिद्ध होते.

इराणी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, धार्मिक संस्थेने इराणवरील अमेरिका-इस्रायली हवाई युद्धात वाचलेल्या 56 वर्षीय मोज्तबा यांची इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून निवड केली. सर्वोच्च नेते निवडणाऱ्या परिषदेचे सदस्य अयातुल्ला मोहसेन हेयदारी अलेक्सिर यांनी रविवारी एका व्हिडिओमध्ये मोज्तबा यांची निवड करण्याचे कारण स्पष्ट केले. युद्धादरम्यान हा अमेरिकेला मोठा धक्का इराणकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारण मोज्तबा खामेनेईच्या नावाला मोठा विरोध अमेरिकेचा होता.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...