AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनावर भारतानं व्यक्त केलंं दु:ख

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा युद्धामध्ये मृत्यू झाला आहे, युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता त्यांच्या मृत्यूवर भारतानं शोक व्यक्त केला आहे.

मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनावर भारतानं व्यक्त केलंं दु:ख
Ayatollah Ali KhameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 5:42 PM
Share

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. बुधवारी भारतामधून इराणकडे निघालेलेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणची ही युद्धनौका बुडाली असून, या घटनेत सुमारे 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या घटनेला 24 तास होत नाहीत तोच इराणने आपला बदला घेतला आहे, इराणने अमेरिकेच्या जहाजावर भीषण हल्ला करून हे जहाज जाळलं आहे.

दरम्यान या युद्धाच्या दुसर्‍याच दिवशी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. भारताकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, अखेर आता भारतानं खामेनेई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. भारत सरकारच्या वतीनं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिल्ली स्थित इराणच्या दुतावासामध्ये जाऊन कंडोलेंस रजिस्टरवर स्वाक्षरी केली. तसेच या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

अयातुल्ला अली खामेनेई हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते होते. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट पसरली, इराण अधिक आक्रमक झालं. दरम्यान या हल्ल्यामध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांची सून, मुलगी, जावई आणि नात यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत 40 कमांडरचा देखील मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर आता भारतानं अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

प्रचंड नुकसान 

या युद्धात आतापर्यंत प्रचंड नुकसान झालं आहे. इराणने देखील इस्त्रायल आणि अमेरिकेवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...