‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

Dr. Amol Kolhe As Nathuram Godse : 1964 साली भारतीय सरकारनं गांधीजींच्या हत्येची कारणं शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगानं आपल्या अहवाल 1970 साली सादर केला होता.

'हां मैने गांधी का वध किया', नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या 'नथूराम गोडसे'त नेमकं काय आहे?
अमोल कोल्हे नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:54 PM

नथुराम गोडसेंच्या (Nathuram Godse) भूमिकेत काल परवापर्यंत शरद पोक्षेंना बघितलेला महाराष्ट्र आता आणखी एका दिग्गज अभिनेत्याला नथुराम गोडसेच्या भूमिकेत पाहणार आहे. आतार्यंत ऐतिहासिक भूमिकांमध्ये माहीर असलेल्या आणि ऐतिहासिक भूमिकांमधूनच घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी चक्क नथुराम गोडसे यांची भूमिका एका सिनेमात साकारली आहे. अत्यंत वादग्रस्त असलेल्या नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या अभिनयाकडे आता चाहत्यांसह सगळ्यांची बारीक नजर असणार आहे. बॉलिवूड प्रॉडक्टने या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या सिनेमात नथुरामाची भूमिका अमोल कोल्हे यांना साकारली आहे, तो सिनेमा महिन्याअखेरीस प्रदर्शित होणार असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. 2017 साली नथुराम गोडे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Limelight या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

काय आहे सिनेमाची खबरबात?

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.

कुणी बनवला सिनेमा?

Why I Killed Gandhi असं या सिनेमाचं नाव असून हिंदी भाषेत तयार करण्यात आलेला हा एक माहितीपट असल्याचंही सांगितलं जातंय. अशोक त्यागी हे या सिनेमाची दिग्दर्शक असून कल्याणी सिंह यांनी या सिनेमाची निर्मितीत केली आहे. तर अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. गांधीची हत्या का केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न माहितीपटातून दिसणार आहे.

1964 साली भारतीय सरकारनं गांधीजींच्या हत्येची कारणं शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगानं आपल्या अहवाल 1970 साली सादर केला होता. या अहवालाच्या आधारेच या सिनेमाची सुरुवात होते. या चित्रपटात बोलला जाणारा प्रत्येक शब्दांनशब्द हा कायदेशीर कागदपत्रांमधून घेतलेल्या शब्दांचा अनुवाद असल्याचं सांगितलं जातंय. एकूण 45 मिनिटांची ही फिल्म असून आता या फिल्मबाबत नेमके प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा सिनेमाचा ट्रेलर –

कुठे पाहायला मिळणार?

हा लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळू शकेल. डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रेक्षकांना एक कळकळीचं आवाहनही केलं आहे. मनमोकळेपणे प्रेक्षकांनी या कलाकृतीकडे पाहावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज किंवा ऐतिहासिक भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसेच्या भूमिकेत प्रेक्षक कितपत स्वीकारतात, हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या :

‘हा महाराष्ट्र तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही’, नथूराम गोडसेची भूमिका का केली? खासदार कोल्हेंनी सविस्तर सांगितलं

Gehraiyaan movie : दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 3 तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.