Gehraiyaan movie : दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 3 तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज

Gehraiyaan movie : दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 3 तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज
gehraiyaan

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोनचा (deepika padukon) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. गेहराईयाँ या चित्रपटाचा ट्रेलर (gehraiyaan movie trailer) नुकताच प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या 3 तासात या ट्रेलरने 2 मिलियनचा टप्पा पूर्ण केलाय. चित्रपटाची कथा गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. यात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 20, 2022 | 6:32 PM

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोनचा (deepika padukon) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. गेहराईयाँ या चित्रपटाचा ट्रेलर (gehraiyaan movie trailer) नुकताच प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या 3 तासात या ट्रेलरने 2 मिलियनचा टप्पा पूर्ण केलाय.

चित्रपटाची कथा

गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. यात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार

गेहराईयाँ हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सिनेरसिकांचा ट्रेलर रिव्ह्यू

दीपिका बॉलिवूडच्या टॉप 5 अभिनेत्री पैकी एक आहे. तिच्या चाहत्यांना दीपिकाच्या नव्या कामाविषयी नेहमीच आदर वाटतो. तिच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे, अशा प्रतिक्रिया या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये पहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या 

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचं निधन, 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें