उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!
कंगना रनौत

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात अनेक सेलिब्रिटीमंडळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत सहभागी होताना दिसत आहेत. काहींना तर राजकीय पक्षांकडून तिकीटदेखील मिळालंय. अशात आता कंगनाने एन्ट्री केली आहे. कंगना रनौतने (kangana ranaut) एक फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर ( instagram) शेअर केला. त्यावर कुणी टिका केली तर कुणी पाठिंबा दिला आहे. कंगनाची पोस्ट […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 20, 2022 | 4:52 PM

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात अनेक सेलिब्रिटीमंडळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत सहभागी होताना दिसत आहेत. काहींना तर राजकीय पक्षांकडून तिकीटदेखील मिळालंय. अशात आता कंगनाने एन्ट्री केली आहे. कंगना रनौतने (kangana ranaut) एक फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर ( instagram) शेअर केला. त्यावर कुणी टिका केली तर कुणी पाठिंबा दिला आहे.

कंगनाची पोस्ट

कंगना आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असते. आपली मतं प्रदर्शित करणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिने अशीच एक स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो शअर केला आहे. यात तिने योगी आदित्यनाथ यांच्या घराची तुलना मायावती, अखिलेश यादव यांच्या घरांशी केली आहे. यात तिने मायावती, अखिलेश यादव यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांचं घर किती साधं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगनाची स्टोरी चर्चाच चर्चा

आता कंगनाने पोस्ट केली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना! या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर करत अनेकांनी कंगनाच्या या पोस्टवरची आपली मतं मांडली आहेत. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिलाय तर काहींनी विरोध दर्शवला आहे.

कंगना उघडपणे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिसते. काही दिवसांपुर्वी कंगनाने योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतला होती. नुकतंच तिला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?

Rohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें