लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, 'किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण'
लता मंगेशकर

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshakar)  यांच्यावर सध्या ब्रीज कँडी (breach candy) रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. तसंच त्या किती दिवसात बऱ्या होतील, हे सांगणे कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. गेली 11 दिवस त्यांच्यावर ब्रीज कँडीमध्ये उपचार सुरू आहेत. लता […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 20, 2022 | 3:52 PM

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshakar)  यांच्यावर सध्या ब्रीज कँडी (breach candy) रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. तसंच त्या किती दिवसात बऱ्या होतील, हे सांगणे कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. गेली 11 दिवस त्यांच्यावर ब्रीज कँडीमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच त्यांना न्यूमोनियाचाही (pneumonia) त्रास होतोय.

डॉक्टर काय म्हणाले?

गेल्या ११ दिवसापासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयुत ऊपचार सुरू आहेत. ‘लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आजही कोणतीही सुधारणा झालेली नाही. सध्या कुणालाही लता दिदींना भेटण्याची परवानगी नाही. तसंच त्या किती दिवसांत बऱ्या होतील, हे सांगणे कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ‘तसंच लतादिदींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न करा’, असंही डॉक्टर म्हणालेत. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. ब्रिज कॅंडी रुग्णालयातील पाच डॉक्टरांचं विशेष पथक लतादिदींवर उपचार करत आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाही

लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लताजी किती दिवसांत बऱ्या होतील हे सांगणे कठीण आहे. लोकांनी लताजी यांच्यासाठी प्रार्थना करावी, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?

Rohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात!

या खेळाडूचे वयाच्या ३ वर्षापासून क्रिकेटशी नाते; कपिल शर्माच्या शोमध्ये उघडले रहस्य

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें