‘हा महाराष्ट्र तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही’, नथूराम गोडसेची भूमिका का केली? खासदार कोल्हेंनी सविस्तर सांगितलं

2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर लवकरचं प्रदर्शित होणार आहे.

'हा महाराष्ट्र तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही', नथूराम गोडसेची भूमिका का केली? खासदार कोल्हेंनी सविस्तर सांगितलं
डॉ. अमोल कोल्हेंनी Why I Killed Gandhi सिनेमात नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे- फोटो- सिनेमातून
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:36 PM

मुंबई – प्रत्येक कलाकारांच्या वाटेला वेगवेगळ्या भूमिका येत असतात. प्रत्येक भूमिकेला न्याय देणाचं काम कलाकार असतो. एखादी व्यक्ती आपल्याला खटकते किंवा आपल्या विचाराची नसते त्यामुळे तिची भूमिका साकारायला कुठलाही नकार देत नाही, ती तितकीच ताकदीने केली जाते. अशीचं भूमिका 2017 साली शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या वाटेला आली. नथुराम गोडसेंची (naturam godse) भूमिका मी तितकीच ताकदीने केली असल्याची कबुली आज अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टच्या (facebook post) माध्यमातून दिली आहे.

2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर लवकरचं प्रदर्शित होणार आहे. त्यावर अनेकांनी अमोल कोल्हे यांना डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? असं विचारल्यानंतर त्यांनी “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्याचं उदाहरण दिलं आहे. या वाक्यातील नकारात्मकता बाजूला ठेऊन सकारात्मका घ्या असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे. तसेच त्यांनी “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक सुध्दा सांगितला आहे. “कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातचं आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो. त्या भूमिका साकारताना समाधानही मिळतं, परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही. तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी फेसबुकला टाकली आहे. ही पोस्ट अत्यंत कमी कालावधी व्हायरल झाली आहे.

नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे

मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: –
२०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.
कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचं निधन, 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.