Salman Khan | चावला साप, आठवला काळवीट, मीमर्स म्हणाले, ‘सलमानला चावलेला साप आयसीयूत!’

सलमानला झालेल्या सर्पदंशाची बातमी शेअर करत एकाने, सलमानला चावल्यानंतर सापाचं काय झालं? असा सवाल केला आहे.

Salman Khan | चावला साप, आठवला काळवीट, मीमर्स म्हणाले, 'सलमानला चावलेला साप आयसीयूत!'
Photo Source - Twitter
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 6:58 PM

मुंबई : भाईजान सलमान खानला (Salman Khan) रविवारी सकाळी साप चावला. बातमी वायूवेगानं चाहत्यांपर्यंत पोहोचली. सलमानच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले. एकामागोमाग एक सलमानच्या बातमीचे अपडेट येत राहिले. आणि सोबत सुरु झाला मीम्सला सिलसिला. बॉलिवूडचा (Bollywood) दबंग स्टार असलेल्या सलमानला सापानं (Snake Bite) चावल्यामुळे काहींनी आपल्या क्रिएटिव्हिटीचा (Creativity) कस लावत एकापेक्षा एक मीम्स पोस्ट केले आहेत. त्यांची ‘चर्चा तर होणारच!’

सकाळी नेमकं काय झालं होतं?

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सलमान खानचा पनवेलमध्ये आज सकाळी सापानं कहर केला. सापानं सलमानला दंश केला. लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता. सलमानचं फार्म हाऊस पनवेलमध्ये ज्या ठिकाणी आहे, तिथं सर्रास सरपटणारे प्राणी आढळून येतात. तिथं साप दिसणं, यात नवीन काहीतरी दिसण्यासारखं नसून, ती एक सर्वसाधारण गोष्ट आहे. पण त्याच सापाला काय माहिती की भाईजान सलमान खान सेलिब्रिटी आहेत ते?

‘नडला की फोडला’ अजेंड्यावर असलेल्या सापानं भाईजानला दंश केला. वाढदिवसाच्या आधीचा दिवशीच सापानं सलमानचा दिवस गाजवला. सोबतच सोशल मीडियावरच्या मीमर्सला भरभरुन कंटेटही सापानं दिलाय. चला तर मग नजर टाकुयात अशात काही हटके मीम्सवर…

चावला साप, लोकांना आठवला काळवीट

अंकित नावाच्या एका ट्विटर युजरनं या घटनेवर ट्वीट करत चक्क सापाला काळविटाचं तोंड लावलंय. सापाच्या रुपात काळवीटच चावला असल्याचा टोला या ट्वीटमधून लगणावण्यात आलाय. फक्त माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो की, 2019मध्ये काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानची सुखरुप सुटका करण्यात आली होती. त्याचा संबंध लावत अंकितनं सर्पदंशाच्या घटनेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय.

ब्लॅक टायगर नावाच्या एका ट्विटर युजरनं तर चक्क सलमान याआधीही अनेकदा सर्पदंशातून बचावल्याचं म्हटलंय. तो बराही होईल, असा विश्वासही व्यक्त केलाय. आता हे साप म्हणजे नेमके कोण, हे मात्र ब्लॅक टायगर या ट्विटर अकाऊंट युजरनं सांगितलेलं नाही. अर्थात हे साप प्रतिकात्मक असतील, असा अंदाज लोकांनी बांधला, तर नवल वाटू नये!

डॉ. एव्ही स्रीव्ह यांनी तर अजबच प्रश्न उपस्थित केलाय. सलमानला झालेल्या सर्पदंशाची बातमी शेअर करत त्यांनी, सलमानला चावल्यानंतर सापाचं काय झालं? असा सवाल केला आहे.

सुशांत मेहता यांनीही ट्वीट करत सलमानला सर्फदंशाची सवय असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलंय. याआधीही सलमानला अनेकदा सर्पदंश होऊन गेला आहे, पण एकाही सापाला यश आलेलं नाही, असं सुशांत यांनी म्हटलंय.

संदीप फोगट यांनी तर म्हटलंय की, सलमानला चावल्यानंतर सापच आयसीयूत गेलाय.

या आणि अशा प्रकारे मीम्स सुरुच आहेत. चाहत्यांना सलमानची चिंता वाटतेय. काहींना सापाची चिंता वाटतेय. मीम्सचा पाऊस पडतच राहतोय. पण सलमान लवकर बरा व्हावा आणि त्याचा वाढदिवसही जोरदार व्हावा, अशा शुभेच्छा देणाऱ्यांची जराही कमी नाही आहे.

संबंधित बातम्या –

Salaman Khan| सलमान खानला कोणत्या प्रजातीचा साप चावला?, हा साप चावल्यास धोका किती?, काय करावे आणि काय करू नये?

Salman Khan Snake Bite | सलमान खानच्या फार्म हाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल, साप चावल्यानंतर दबंग अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी नवे अपडेट्स

Jackie Shroff : जॅकी श्रॉफनं आपल्या ज्योतिषी वडिलांविषयी केला मोठा खुलासा, भावाच्या मृत्यूपूर्वी…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.