Jackie Shroff : जॅकी श्रॉफनं आपल्या ज्योतिषी वडिलांविषयी केला मोठा खुलासा, भावाच्या मृत्यूपूर्वी…

जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलीवूड(Bollywood)मधील दिग्गज अभिनेते आहेत. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवलाय. अलीकडेच ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna)सोबत झालेल्या संवादादरम्यान आपल्या वडिलांविषयी खुलासा केला.

Jackie Shroff : जॅकी श्रॉफनं आपल्या ज्योतिषी वडिलांविषयी केला मोठा खुलासा, भावाच्या मृत्यूपूर्वी...
जॅकी श्रॉफ
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 4:34 PM

मुंबई : जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलीवूड(Bollywood)मधील दिग्गज अभिनेते आहेत. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवलाय. अलीकडेच ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna)सोबत झालेल्या संवादादरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केलाय. त्यांनी ट्विंकलला सांगितलं, त्यांच्या ज्योतिषी असलेल्या वडिलांनी आपल्या भावाच्या मृत्यूपूर्वी भाकीत केलं होतं, की आज काहीतरी वाईट होणार आहे. त्यांनी आपल्या भावालाही सावध केलं होतं. दुर्दैवानं भाऊ एका भीषण अपघातात हे जग सोडून गेला.

‘पोहता येत नसताना समुद्रात’ ट्विंकलशी तिच्या ट्वीक इंडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले, की आज त्यांच्या भावासाठी वाईट दिवस आहे, सेंचुरी मिल्समध्ये काम करण्यासाठी बाहेर जाऊ नका. तो गिरणी कामगार होता. ते म्हणाले होते, की आज तुझ्या गिरणीत जाऊ नकोस आणि तो गेला नाही. पण पोहायचं माहीत नसतानाही एखाद्याला वाचवण्यासाठी तो समुद्रात उतरला आणि बुडाला.

‘ज्योतिषी वडिलांची भविष्यवाणी खरी ठरली’ तो पुढे म्हणाला, “जेव्हा ते म्हणाले, की तो वाईट दिवस होता, तेव्हा माझा भाऊ मृत्यू पावला. त्यांनी मला सांगितलं, की मी अभिनेता होणार, मी अभिनेता झालो. ते नटूभाई अंबानी आणि काकिलाबेन अंबानी यांच्या जवळ होते आणि त्यांना म्हणाले, तुमचा नवरा एक दिवस मोठा माणूस होईल. हे ऐकून आपण वेडे झालो होतो, असं धीरूभाई म्हणाले होते.

इंग्रजीमागची गोष्टही सांगितली ट्विंकल खन्नानंही जॅकीचं त्याच्या इंग्रजी उच्चारासाठी कौतुक केलं होतं. तो म्हणाला, की माझा जन्म मुंबईत झाला. दुर्दैवाने मी 11वीच्या पुढे शिक्षण घेतलं नाही. या अनुभवाचं आणि शिकण्याचं वर्णन करताना तो म्हणाला, की मी ऐकलं, कान उघडे ठेवून सिनेमे पाहिले, क्लिंट ईस्टवुडला आपलं इंग्रजी शिक्षक मानलं.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याला किती पैसे मिळतात? तुम्हाला माहितेय का?

Ram Gopal Varma on RRR : राम गोपाल वर्मांनी Omocron आणि RRRच्या रिलीजविषयी दिली प्रतिक्रिया, सरकारला केली ‘ही’ विनंती

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.