Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याला किती पैसे मिळतात? तुम्हाला माहितेय का?

मागील दोन सीझनप्रमाणेच या सीझनमधील विजेत्याला देखील भरघोस बक्षीस रक्कम आणि ‘बिग बॉस मराठी 3’ची मानाची ट्रॉफी मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याला किती पैसे मिळतात? तुम्हाला माहितेय का?
बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे अंतिम स्पर्धक
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 4:27 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) आज ग्रँड फिनाले आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम (Vishal Nikam), मीनल शाह (Meenal Shah), विकास पाटील (Vikas Patil), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आणि जय दुधाणे (Jay Dudhane) यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस’ विजेत्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून भरघोस रक्कम देखील मिळणार आहे.

मागील दोन सीझनप्रमाणेच या सीझनमधील विजेत्याला देखील भरघोस बक्षीस रक्कम आणि ‘बिग बॉस मराठी 3’ची मानाची ट्रॉफी मिळणार आहे.

विजेत्याला किती मिळणार बक्षीस?

विजेत्याची बक्षीस रक्कम आधी 25 लाख होती, पण आता ती 20 लाखांवर आणली गेली आहे. अलीकडील टास्कमध्ये, बिग बॉसने ‘टॉप 7’ घरातील सदस्यांना 25 लाखांची बक्षीस रक्कम आपापसात वाटून घेण्यास सांगितले. त्यांनी सात स्पर्धकांसाठी सात प्लेट्स दिल्या आणि प्रत्येक प्लेटवर काही रक्कम नमूद केली होती. प्लेट्समध्ये रु. 12,50,000, रु. 6,00,000, रु. 3,25,000, रु. 1,50.000 रु. 1,00,000, रु. 50,000, रु., 25000 असे त्यावर लिहिले होते.

विजेत्याच्या रकमेतून 5 लाख वजा!

‘बिग बॉस’ने असेही घोषित केले होते की, जर एखाद्या स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी नामांकन मिळाले, तर त्याला/तिला नियुक्त केलेली रक्कम अंतिम बक्षीस रकमेतून वजा केली जाईल. या टास्कमध्ये मीराला नॉमिनेट केले गेले आणि बक्षिसाच्या रकमेतून तिला देण्यात आलेल्या पाटीवरचे 25000 रुपये कमी झाले. त्यानंतर अनुक्रमे सोनाली पाटील 50 हजार, उत्कर्ष शिंदे 1,00,000, विकास पाटील 3,25,000  नॉमिनेट झाल्याने ही रक्कम बक्षिसाच्या रकमेतून कमी करण्यात आली. अखेरीस एकूण अंतिम बक्षीस रकमेतून 5,00,000 रुपये कमी झाले. इतकेच नाही तर, ‘बिग बॉस मराठी 3’ विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकाला अनेक गिफ्ट हॅम्पर देखील देण्यात येतात.

कधी आणि कुठे पाहाल सोहळा?

‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रविवारी अर्थात 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि या सोहळ्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी 3’ सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येणार आहे. हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वूट’वर पाहता येणार आहे.

हेही वाचा :

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.