AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singer Udit Narayan: कट रचून माझं गर्भाशय काढलं आणि…, गायक उदित नारायण यांच्यावर पहिल्या पत्नीकडून गंभीर आरोप…

Singer Udit Narayan: फसवून मोठ्या रुग्णालयात नेलं... कट रचून माझं गर्भाशय काढलं आणि... उदित नारायण यांच्यावर पहिल्या पत्नीकडून गंभीर आरोप... जाणून व्हाल थक्क....

Singer Udit Narayan: कट रचून  माझं गर्भाशय काढलं आणि..., गायक उदित नारायण यांच्यावर पहिल्या पत्नीकडून गंभीर आरोप...
| Updated on: Feb 11, 2026 | 9:05 AM
Share

Singer Udit Narayan: प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचं खासगी आयुष्या गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र चर्चेत आहे. उदित नारायण यांच्या पहिल्या पत्नी रंजना नारायण झा यांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. रंजना झा यांनी महिला पोलिस स्टेशनमध्ये उदित नारायण आणि अन्य तीन जणांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय कुमार झा, ललित नारयण झा आणि दुसरी पत्नी दिपा नारायण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कट रचून गर्भाषय काढल्याचे.. गंभीर आरोप उदित नारायण आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहे.

1984 मध्ये झालेले उदित आणि रंजना यांचं लग्न..

वकील करुणाकांत झा यांच्यासोबत महिला पोलिस स्टेशन गाठताना रंजना म्हणाल्या, सुपौल जिल्ह्यातील बलुआ बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत संस्कृत निर्मली वॉर्ड क्रमांक 11 येथील रहिवासी चंद्रकांत झा यांची मी 61 वर्षीय मुलगी आहे. 7 डिसेंबर 1984 मध्ये रंजना यांचं लग्न उदित नारायण यांच्यासोबत हिंदू परंपरेनुसार झालं होतं. त्यानंतर 1985 मध्ये उदित नारायण संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुंबईत आले. यादरम्यान माध्यमांद्वारे कळलं की, उदित यांनी दिपा नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं.. जेव्हा रंजना यांनी उदित यांना दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं… तेव्हा गायकाने पहिल्या पत्नीची दिशाभूल केली.

दिल्लीत काढलं गर्भाशय…

रंजना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1996 मध्ये, उपचाराच्या नावाखाली, उदित, त्यांचा भाऊ संजय कुमार झा आणि ललित नारायण झा यांनी रंजना यांना दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यासाठी फसवलं, जिथे रंजना यांच्या नकळत तिचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. उदितची दुसरी पत्नी दीपा देखील त्याठिकाणी उपस्थित होत्या.

रंजना पुढे म्हणाली, ‘2006 मध्ये जेव्हा मी मुंबईत गेले, तेव्हा उदित आणि दिपा यांनी मला शिवीगाळ केला. त्यांनी मला घरात प्रवेश देखील करु दिला नाही. त्यानंतर मी नेपाळमधील सप्तरी जिल्ह्यातील भरदहा येथे सासरच्या घरी गेली, परंतु तिथेही मला तिरस्कार आणि हाकलून देण्यात आलं. तेव्हापासून मी माझ्या आई – वडिलांच्या घरी आहेत.’

रंजना म्हणाली की, तिने उदित यांच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्या प्रकरणात, उदित यांनी रंजना ही त्याची पत्नी असल्याचं मान्य करून त्यांना आपल्याकडे ठेवण्यास सहमती दर्शविणारा पत्र दाखल केलं बोतं. तेव्हा पर्यंत रंजना यांनी कोणताच सन्मान आणि मदत मिळाली नाही. पतीकडून मदत मिळत नव्हती, तेव्हापर्यंत रंजना आर्थिक तंगी आणि सतत आजारी पाहत होत्या… अशी माहिती देखील समोर आलेली.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप