Tiger Shroff : टायगर सर एक नंबर बॉडी.. इथे या ना..अरे जरा प्रेमाने बोल..हल्ला होण्याच्या काही सेकंद आधीचा VIDEO समोर

Tiger Shroff : बॉलिवूडला हादरवून सोडणारी घटना काल घडली. बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफवर काल गोळीबार झाला. सुदैवाने टायगर या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. टायगर श्रॉफ हिरो जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे.

Tiger Shroff : टायगर सर एक नंबर बॉडी.. इथे या ना..अरे जरा प्रेमाने बोल..हल्ला होण्याच्या काही सेकंद आधीचा VIDEO समोर
Tiger Shroff
| Updated on: Oct 19, 2026 | 8:21 AM

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफवर काल गोळीबार झाला. जुहू परिसरात ही घटना घडली. जिथे ही घटना घडली, तिथून जुहू पोलीस स्टेशन जवळच आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर जवळपास दहा गोळ्या झाडल्या. सुदैवाने टायगर श्रॉफ या हल्ल्यातून बचावला. पण टायगरचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षावाला या हल्ल्यात जखमी झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टायगर श्रॉफवर जुहू परिसरात ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असाचं एक व्हिडिओ समोर आला आहे. टायगर श्रॉफ तिथे फुटबॉल खेळण्यासाठी आला होता. फुटबॉल खेळून झाल्यावर तो गाडीत बसतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

घटनास्थळावरचा एक व्हिडिओ आहे, त्यात टायगर श्रॉफ त्याच्या BMW गाडीत बसायला जातानाचा हा व्हिडिओ आहे. टायगर श्रॉफ त्याच्या कारचा दरवाजा उघडतो. तितक्यात ‘टायगर सर एक नंबर बॉडी. इथे या ना. बराचवेळापासून थांबलोय आम्ही’ असं बाहेरुन आवाज येत आहे. ‘अरे जरा प्रेमाने बोल’ असे शब्द सुद्धा या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेत. टायगर श्रॉफने अंगावर एक टॉवल घेतलेला आहे. टायगर समोर उभ्या असलेल्या पैकी कोणाला तरी बोलावतो. एक मुलगी धावत येते. टायगर हसून तिच्याशी बोलतो. गाडीत बसतो व निघतो. तितक्यात गेटच्या प्रवेशद्वारावर थांबलेले हल्लेखोर टायगरच्या कारवर गोळीबार करतात.

Loading...

टायगर कार मध्ये बसण्याआधी काही सेकंद कारचा दरवाजा पकडून उभा होता. त्याच्यावर अंगावर फक्त टॉवेल होतं, टी-शर्ट घातलेलं नव्हतं. नशीब त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या नाहीत. अन्यथा यापेक्षा जास्त अप्रिय काहीतरी घडलं असतं. टायगरचे जे फोटो समोर आलेत, त्यात त्याच्या दंडावर आणि छातीवर ड्रेसिंग दिसत आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्याची ही घटना म्हणजे बॉलिवूडसाठी मोठा हादरा आहे. लॉरेन्स बिश्नोईल गँगकडून या आधी सुद्धा बॉलिवूड स्टार्सना धमक्या मिळाल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us