दिव्या भारतीच्या शेवटच्या रात्रीचं धक्कादायक सत्य, 32 वर्षांनंतरही गुढ कायम, थक्क करणारी इनसाइड स्टोरी!

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती हिला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. अभिनेत्रीसोबत जे काही घडून गेलं, त्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अशात त्या शेवटच्या रात्री घडलेल्या त्या धक्कादायक घडनेचं गुढ आजही कायम आहे, तर जाणून घ्या थक्क करणारी इनसाईड स्टोरी...

दिव्या भारतीच्या शेवटच्या रात्रीचं धक्कादायक सत्य, 32 वर्षांनंतरही गुढ कायम, थक्क करणारी इनसाइड स्टोरी!
अभिनेत्री दिव्या भारती
| Updated on: Oct 01, 2026 | 1:05 PM

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या… पण काही अभिनेत्रींची चर्चा त्यांच्या निधनानंतर देखील रंगलेली असते. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती… दिव्या भारती हिने स्वतःला संपवलं की यासाठी कोणी कट रचला… यामागचं गुढ अद्यापही कायम आहे… जेव्हा दिव्या हिने अखेरचा श्वास घेतला, तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. त्या दिवशी नवरा साजिद नडियाडवाला याच्यासोबत दिव्याचं भांडण झालं होतं का? दारुचे सेवन आणि ग्रील नसलेल्या खिडकीचं रहस्य? अखेर त्या रात्री तुलसी अपार्टमेंट्या 503 या खोलीत काय झालेलं? जाणून घ्या दिव्या भारती हिच्या शेवटच्या रात्रीची धक्कादायक गोष्ट…

दिव्या भारती हिने निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्याशी गुपचूप लग्न केलं होतं. लग्नानंतर अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारलं आणि स्वतःचं नाव ‘सना’ ठेवलं. रिपोर्टनुसार, मृत्यूच्या रात्री दिव्या खूप तणावाखाली होती. असं देखील म्हटलं जातं की, त्या रात्री साजिद आणि दिव्या यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून तीव्र वाद झाला होता. या वादाचं कारण साजिदच्या कुटुंबाने हे लग्न स्वीकारण्यास दिलेला नकार किंवा दिव्याची आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये समतोल साधता न येणं हे सांगितलं जातं. पण, साजिदने या गोष्टी नेहमीच फेटाळून लावल्या, परंतु प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की त्या रात्री वातावरण सामान्य नव्हतं. काहीतरी संशय येण्यासारखं घडत होतं.

Loading...

5 एप्रिलच्या रात्री दिव्याच्या घरी प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला आणि त्यांचे पती उपस्थित होते. दिव्या मद्यपान करत होती आणि सोफ्यावर बसून बोलत होती. यादरम्यान दिव्या उठली आणि खिडकीजवळ गेली. त्या अपार्टमेंटच्या खिडकीला ग्रील बसवलेली नव्हती. असं सांगितले जातं की, दिव्या खिडकीच्या चौकटीवर बसण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल गेला. रुग्णालयात नेत असताना अभिनेत्री मृत्यू झाला.

दिव्या हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क समोर आले. काही लोकांनी याला अंडरवल्डशी जोडलं, तर काही जणांनी याची हत्या म्हणून नोंद केली. साजिद नाडियाडवाला यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले, पण कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, दिव्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त होतं, ज्यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, दारूच्या नशेत तोल गेल्यामुळे ही एक ‘दुर्घटना’ होती. 1998 मध्ये मुंबई पोलिसांनी पुराव्या अभावी या प्रकरणाची फाईल कायमची बंद केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us