ईशा कोप्पिकर म्हणते अंधभक्त होण्याचा गर्व आहे..काय कारण?

कलाकार राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर कधी भूमिका घेत नाहीत अशी टीका होत असते. कलाकार नेहमीच सत्तेला शरण जाणेच पसंद करत असतात. त्यात आता एका अभिनेत्रीने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

ईशा कोप्पिकर म्हणते अंधभक्त होण्याचा गर्व आहे..काय कारण?
bollywood abhinetri isha koppikar
| Updated on: Aug 18, 2026 | 9:13 PM

देशात सध्या ‘जेन झी’ आंदोलनानंतर एक सामाजिक घुसळण सुरु आहे. काही कलाकार सरकारच्या विरोधात बोलत आहेत तर काही कलाकार सरकारच्या बाजूने बोलत आहेत. त्यात आता आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. जर देशावर प्रेम करणे आणि त्याच्या प्रगतीची इच्छा बाळगणे यालाच ‘अंधभक्ती’ म्हटले जात असेल, तर ‘अंधभक्त’ असण्याचा मला अभिमान आहे असे या अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने म्हटले आहे.

ईशा कोप्पिकर हीने आपली भूमिका मांडताना माझी भक्ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही, तर माझ्या देशासाठी आहे. आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो आणि त्यांच्या धोरणांशी असहमत असू शकतो, परंतु माझ्या देशावर माझे प्रेम सदैव राहील असेही बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने म्हटले आहे.

ईशा हीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते ‘माणूस जिथे राहातो त्या जागेचा सन्मान करायला हवा, आणि त्यास चांगले करण्यासाठी आपले योगदान देखील दिले पाहिजे. केवळ एवढे बोलणे की आम्हाला आमच्या देशावर प्रेम आहे ही देश भक्ती नाही. असली देशभक्ती तेव्हा असते.जेव्हा कोणती व्यक्ती आपल्या कामाने देशाला चांगले बनवण्याचा प्रयत्न करते.’ अभिनेत्री ईशा कोप्पिकर हीने मुलांचे उदाहरण देत पुढे सांगितले की दोन प्रकारचे मुले असतात. एक मुल अस असते जे संपूर्ण जीवन आपल्या आई-वडीलांनी काय दिले आणि काही नाही दिले याचा हिशेब करत असते. तर दुसरे मुल असे असते जे आपल्या आई-वडीलांकडून मिळालेल्या वस्तू स्वत: पुरत्या मर्यादित ठेवत नाही. उलट त्याने आपल्या आई-वडीलांची जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करते.

येथे पाहा व्हिडीओ –

ईशा पुढे म्हणाली की,’ दोन्ही मुलांच्या दरम्यान फरक केवळ परिस्थितीचा नाही, तर विचारांचा आहे. या विचाराने देशासाठी बदलण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येक वेळी विचारण्याच्या ऐवजी देशाला आपण काय दिले आहे आणि काय देऊ शकतो याचा विचार करायला हवा. आपल्याला हा विचार करायला हवा की आपले काम आणि विचाराने आपण भारतासाठी काय चांगले करु शकतो.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us