Nushrratt Bharuccha : नुसरतचं स्वतःच्या पायावर उभं रहाणंही झालंय कठीण, जवळच्या व्यक्तीकडून हेल्थ अपडेट, जाणून व्हाल हैराण

Nushrratt Bharuccha Health Update: अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या सध्या मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकताच तिचा बाली याठिकाणी सुट्ट्यांसाठी गेली असताना अपघात झाला आहे. आता अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीकडून हेल्थ अपडेट समोर आले आहेत.

Nushrratt Bharuccha : नुसरतचं स्वतःच्या पायावर उभं रहाणंही झालंय कठीण, जवळच्या व्यक्तीकडून हेल्थ अपडेट, जाणून व्हाल हैराण
Nushrratt Bharuccha
| Updated on: Oct 04, 2026 | 7:55 AM

Nushrratt Bharuccha Health Update: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. बाली येथे सुट्ट्यांसाठी गेली असताना नुसरत हिचा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बाली येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला विशेष एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले असून, मणक्याची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. सध्या मुंबईत अभिनेत्रीवर उपचार सुरु आहे. आता नुसरत हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. तर अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने तिची हेल्थ अपडेट दिली आहे.

मुंबईत परतली नुसरत भरुचा…

Loading...

बालीमध्ये उपचार घेतल्यानंतर, नुसरत भरुचा हिला काल एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले. सध्या तिच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तिच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीवर पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. नुसरत मुंबईत दाखल झाली तेव्हा तिची आई, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी तिच्यासोबत होते.

कशी आणि नुसरत हिची प्रकृती

नुसरत हिच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘तिच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. मी तिच्या आईच्या संपर्कात आहे आणि सतत तिच्या तब्येतीबद्दल विचारत आहे. सध्या माझ्याकडे एवढीच माहिती आहे. आता मी स्वतःच नुसरत हिची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहे…’, नुसरत हिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं कळल्यानंतर चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे.

सध्या नुसरत हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक दिसत आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की, अभिनेत्री भविष्यात आधाराशिवाय उभी देखील राहू  शकत नाही. यावर अद्याप डॉक्टरांनी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कधी झाला अपघात?

सांगायचं झलं तर, नुसरत काही कामासाठी इंडोनेशियातील बाली येथे गेली होती आणि तिने तिथे आपला मुक्काम वाढवला होता. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी तिचा अपघात झाल्याची बातमी समोर आली. त्याआधी साधारण आठवडाभर, नुसरत भरुचाने सोशल मीडियावर बाली येथील सुट्टीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती सुट्टीचा आनंद घेताना दिसत होती. त्यानंतर, तिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us