घटस्फोटाची चर्चा; पण ऐश्वर्या रायचा पती अभिषेक सोबत जबराट डान्स, ‘अशी’ होती लेक आराध्याची रीअ‍ॅक्शन, Video व्हायरल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बी टाउनमधील एक प्रसिद्ध कपल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक जिवनामध्ये तणाव असल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

घटस्फोटाची चर्चा; पण ऐश्वर्या रायचा पती अभिषेक सोबत जबराट डान्स, अशी होती लेक आराध्याची रीअ‍ॅक्शन, Video व्हायरल
| Updated on: Dec 09, 2024 | 5:56 PM

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बी टाउनमधील एक प्रसिद्ध कपल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक जिवनामध्ये तणाव असल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत. एवढंच नव्हे तर ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र यावर अद्याप बच्चन कुटुंबातील कुठल्याही सदस्याकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. हे सर्व सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या दोघांमध्ये सर्व सुरळीत सुरू असल्याचा अंदाज त्यांच्या फॅन्सकडून व्यक्त करण्यात येत आहे. ऐश्वर्या राय बच्चन फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठल्यातरी लग्न समारंभातील आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे ‘देसी गर्ल’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.यावेळी तिथे ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी अराध्या देखील होती. ती देखील या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय आपली मुलगी अराध्यासोबत ‘देसी गर्ल्स’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे गाणं ‘दोस्ताना’ चित्रपटातील आहे. जो चित्रपट 2008 साली रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, प्रियंका चोपडा आणि जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

दरम्यान दुसरीकडे घटस्फोटाची चर्चा सुरू असातना हे कपल्स एका पार्टीमध्ये देखील स्पॉट झालं. या पार्टीमधील दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, फिल्म प्रोड्यूसर अनु रंजन यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता या दोघांमध्ये सर्व नॉर्मल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही त्यांच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे.