Anupam Kher: अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान मोदींसाठी दिली खास भेट; पहा Photo

| Updated on: Apr 24, 2022 | 9:41 AM

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केले. अनुपम यांनी त्यांची आई दुलारी खेर (Dulari Kher) यांच्या वतीने दिलेली खास भेटसुद्धा यावेळी नरेंद्र मोदींना दिली.

Anupam Kher: अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान मोदींसाठी दिली खास भेट; पहा Photo
Anupam Kher meets PM Narendra Modi
Image Credit source: Instagram
Follow us on

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केले. अनुपम यांनी त्यांची आई दुलारी खेर (Dulari Kher) यांच्या वतीने दिलेली खास भेटसुद्धा यावेळी नरेंद्र मोदींना दिली. या पोस्टमध्ये त्यांनी मोदींच्या कामाचाही उल्लेख केला. या भेटीदरम्यान अनुपम यांनी पांढरा शर्ट, काळी पँट आणि नेहरू जॅकेट परिधान केला होता. पहिल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनुपम खेर हे कॅमेरासमोर उभे असताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अनुपम हे पंतप्रधानांना रुद्राक्षांची माळ भेट म्हणून देताना दिसत आहेत. अनुपम यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

‘आदरणीय पंतप्रधानजी, आज तुम्हाला भेटून मन आणि आत्मा दोन्ही सुखावले. देशासाठी आणि देशवासीयांसाठी तुम्ही अहोरात्र करत असलेल्या परिश्रमाबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणायची संधी मिळाली. ज्या श्रद्धेने तुम्ही माझ्या आईने दिलेली रुद्राक्षांची माळ स्वीकारली, ते मला आणि दुलारीजींना नेहमीच लक्षात राहील. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो आणि आम्हा सर्वांना तुम्ही अशीच ऊर्जा देत राहा, जय हिंद,’ असं कॅप्शन खेर यांनी या फोटोंना दिलं. अनुपम खेर यांनी हेच फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरसुद्धा शेअर केले आहेत. त्यावर मोदींनीही ट्विट करत उत्तर दिलं. ‘अनुमप खेरजी तुमचे खूप खूप आभार. आदरणीय माताजींचा आणि देशवासियांचा आशीर्वादच मला भारत माँच्या सेवेसाठी सतत प्रेरित करत आहे’, असं त्यांनी लिहिलं.

अनुपम खेर यांची पोस्ट-

ट्विटरवर मोदींची प्रतिक्रिया-

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट 1990 च्या दशकात काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायावर भाष्य करतो. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनुपम खेर यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी आणि इतर कलाकार आहेत. द काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले. महामारीच्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला.

हेही वाचा:

Aai Kuthe Kay Karte: ‘..तर फार अस्वस्थ होतं’; ‘अरुंधती’ची ही खास पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत

‘वाह, काय टायमिंग साधलंत!’; अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वक्तव्यानंतर किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस