Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..

मालिका, वेब सीरिज किंवा चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा फिटनेसवर अधिकाधिक भर असतो. मग त्याला वयाचंही बंधन नसतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्याकडे पाहिल्यावर या गोष्टीची प्रचिती येते.

Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..
Anupam KherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:06 AM

मालिका, वेब सीरिज किंवा चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा फिटनेसवर अधिकाधिक भर असतो. मग त्याला वयाचंही बंधन नसतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्याकडे पाहिल्यावर या गोष्टीची प्रचिती येते. वयाच्या 67व्या वर्षीही ते अत्यंत फिट असून चाहत्यांसाठी त्यांनी नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (physical transformation) सहज पहायला मिळतंय. जुन्या आणि नव्या फोटोचा कोलाज त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. गेल्या महिन्यातच अनुपम यांनी 67वा वाढदिवस साजरा केला. यावेळीसुद्धा त्यांनी फिटनेसचा (Fitness) स्वत:चा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

अनुपम यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या या कोलाजमध्ये एका बाजूला त्यांचा जुना फोटो पहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आताचा ‘फिट अँड फाइन’ फोटो पहायला मिळतोय. ‘आहे तसंच राहण्याच्या इच्छेपेक्षा सतत बदलण्याची तुमची इच्छा ही मोठी असली पाहिजे. तंदुरुस्त राहण्याची सुरुवात जिममध्ये डंबल्सने होत नाही, तर हे तुमच्या डोक्यात निर्णय घेऊन सुरू होतं. निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या कॅप्शनसह त्यांनी ‘कुछ भी हो सकता है’ असा हॅशटॅग दिला आहे.

अनुपम खेर यांचे फोटो-

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम यांच्या या फोटोने नेटकऱ्यांना चांगलीच प्रेरणा दिल्याचं पहायला मिळतंय. ‘काल रात्री मी याबाबतचा निर्णय घेतला होता आणि आता तुमचा फोटो पाहिल्यावर मला आणखी प्रेरणा मिळाली’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘माइंडसेट हेच सर्वस्व आहे’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं. ‘तुमचा हा फोटो ट्रान्सफॉर्मेशनच्या जाहिरातीसाठी द्या’, असंही एकाने कमेंट्समध्ये लिहिलं. अनुपम खेर यांनी याआधीही जिममधील वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अनुपम हे नुकतेच ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं असून त्याची कथा मैत्रीवर आधारित आहे. यामध्ये परिणीती चोप्रा, बोमन इराणी, अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी डेंझोप्पा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

हेही वाचा:

Sher Shivraj: दिग्पाल लांजेकरच्या ‘शेर शिवराज’मध्ये कलाकारांची तगडी फौज

सोनम कपूरच्या घरी नर्सने कशाप्रकारे केली अडीच कोटींची चोरी? पोलिसांनी सांगितली Modus Operandi

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.