सोनम कपूरच्या घरी नर्सने कशाप्रकारे केली अडीच कोटींची चोरी? पोलिसांनी सांगितली Modus Operandi

अभिनेत्री सोनम कपूरचा (Sonam Kapoor) पती आनंद अहुजाच्या (Anand Ahuja) घरातून जवळपास अडीच कोटी रुपयांची चोरी झाली होती. अपर्णा रुथ विल्सन आणि तिचा पती नरेश कुमार सागर या दोघांनी 11 महिन्यांत 2.45 कोटी रुपयांचे दागिने आणि पैसे चोरले.

सोनम कपूरच्या घरी नर्सने कशाप्रकारे केली अडीच कोटींची चोरी? पोलिसांनी सांगितली Modus Operandi
Sonam KapoorImage Credit source: Instagram/ Sonam Kapoor
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 6:05 PM

अभिनेत्री सोनम कपूरचा (Sonam Kapoor) पती आनंद अहुजाच्या (Anand Ahuja) घरातून जवळपास अडीच कोटी रुपयांची चोरी झाली होती. अपर्णा रुथ विल्सन आणि तिचा पती नरेश कुमार सागर या दोघांनी 11 महिन्यांत 2.45 कोटी रुपयांचे दागिने आणि पैसे चोरले. चोरलेल्या पैशांचं या दोघांनी काय केलं, त्याविषयीची माहिती आता समोर आली आहे. अपर्णा आणि नरेशने चोरलेले दागिने देव वर्मा या सोनाऱ्याकडे विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी त्यांनी कर्ज फेडलं, आईवडिलांच्या उपचारासाठी खर्च केले आणि सेकंड हँड i-10 कार विकत घेतली. चोरीच्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांनी याबद्दलची कबुली दिली. (Sonam Kapoor Delhi house robbery)

चोरी केलेल्या वस्तू-

तीन संशयितांना पकडणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी या तिघांच्या ताब्यातून 1.25 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत. दागिने आणि रोख रक्कम चोरण्याचा कट रचणाऱ्या विल्सन आणि सागर यांना बुधवारी अटक केल्याची माहिती विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी दिली. “आम्ही चोरीच्या वस्तू खरेदी करणारा सोनार देव वर्मा यालाही अटक केली आहे आणि त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 100 हिरे, सहा सोन्याच्या चेन, सहा हिऱ्यांच्या बांगड्या, एक हिऱ्याचे ब्रेसलेट, दोन टॉप्स, एक पितळी नाणं आणि एक हुंडाई आय-10 कारचा समावेश आहे. जप्त केलेल्या वस्तूंची अंदाजे किंमत ही 1.32 कोटी रुपये इतकी आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.

नर्सने रचला चोरीचा कट

“अपर्णा विल्सन ही मूखची लखनौची आहे आणि तिने 2013 मध्ये प्रयागराजमधून नर्सिंगचा डिप्लोमा केला आहे. दिल्ली शिफ्ट होण्यापूर्वी तिने 2015 पर्यंत देहरादूनमधील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केलं. शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात नोकरी मिळण्यापूर्वी तिने अनेक स्थानिक नर्सिंग होम आणि हॉस्पिटलमध्ये काम केलंय. 2017 मध्ये तिने सागरशी लग्न केलं. फेसबुकवर या दोघांची ओळख झाली होती,” अशी माहिती विशेष आयुक्तांनी दिली.

2020 मध्ये सोनम कुमारच्या सासूला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असं यादव म्हणाले. “त्यांची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलने प्रेमलता नावाच्या एका परिचारिकाला नियुक्त केलं होतं. काही दिवसांनंतर प्रेमलताने तिची मैत्रीण विल्सनला कळवलं की अहुजा कुटुंबीय नवी दिल्लीतील त्यांच्या घरात सासूची काळजी घेण्यासाठी आणखी एक नर्स शोधत आहे. विल्सन मार्च 2021 पासून अहुजांच्या निवासस्थानी भेट देत होती. या भेटीदरम्यान तिने दागिने आणि रोख रक्कम ठेवण्याची जागा पाहिली. एके दिवशी तिने याबाबत पतीला सांगितलं आणि चोरीचा कट रचला. घरमालकांना चोरीबाबत कळू नये म्हणून त्याने तिला एका वेळी एकच दागिना चोरण्यास सांगितलं,” असं त्यांनी सांगितलं.

विशेष आयुक्तांनी सांगितलं की, रुग्णाला औषधं दिल्यानंतर विल्सन त्या खोलीतून दागिने चोरायची. अशा पद्धतीने जवळपास 11 महिने ही चोरी सुरू होती. विल्सन चोरलेल्या वस्तू पतीला आणून देत असे आणि तो ज्वेलर्स आणि इतर लोकांना ते विकायचा.

हेही वाचा:

Aai Kuthe Kay Karte: संजनाला अरुंधती घडवणार अद्दल; देशमुख कुटुंबीयांसमोर होणार तिला अटक?

Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.