AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की…

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत केलेल्या चुकीचा फटका बसला आहे. अंतिम सामन्यात त्याने आयसीसी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे माफी मागूनही त्याला दंड भरावा लागणार आहे.

Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की...
Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 10, 2026 | 6:17 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं आहे. पण या स्पर्धेतील काही घडामोडी अजूनही प्रभाव टाकत आहेत. या स्पर्धेत अर्शदीप सिंगने जबरदस्त कामगिरी केली होती. टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण अंतिम सामन्यात केलेली एक चूक त्याला भोवली आहे. अर्शदीप सिंग आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्या सामना मानधनातून 15 टक्के रक्कम कापली गेली आहे. अर्शदीप सिंगने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलला रागाच्या भरात चेंडू मारला होता. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर अर्शदीप सिंगला दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे अर्शदीप सिंगला टी20 वर्ल्डकप अंतिम सामन्याचं मानधन पूर्ण मिळणार नाही. त्याच्या सामना फीमधून 45 हजार रूपये कापले जाणार आहेत. टीम इंडियाच्या एका खेळाडूला एका टी20 सामन्यासाठी 3 लाख मिळतात. त्यामुळे सामना फीमधून 15 टक्के कापले गेल्याने 2 लाख 55 हजार रुपये मिळतील.

अर्शदीप-मिचेल यांच्यात वाद

न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना अर्शदीप सिंगकडे संघाचं 11वं षटक सोपवण्यात आलं होतं. या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मिचेलने षटकार मारला. त्यामुळे अर्शदीप सिंगचा पारा चढला होता. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मिचेलचा प्रयत्न होता. पण चेंडू सरळ अर्शदीपच्या हाती गेला. त्यामुळे रागाच्या भरात अर्शदीपने चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. पण हा चेंडू डॅरेल मिचेल लागला. अर्शदीपच्या या कृतीचा डॅरेल मिचेलला राग आला. त्यानंतर तो अर्शदीपच्या दिशेने गेला, पण पंचांनी त्याला अडवलं. सूर्यकुमारनेही डॅरेलची समज काढली. त्यानंतर अर्शदीप सिंगने मिचेलजवळ जाऊन माफी मागितली.

सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंगने हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने या सामन्यात घडलेल्या प्रकरणाचा उल्लेख केला. त्याने सांगितलं की, तो चेंडू दुसऱ्या बाजूला फेकत होता, पण चेंडू रिव्हर्स स्विंग झाला. सामन्यानंतर अर्शदीप सिंग आणि डॅरेल मिचेल एकत्र दिसले. यावेळी त्याने पुन्हा एकदा माफी मागितली. पण आयसीसीच्या मते हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे दंड ठोठावला आहे. तसं पाहिलं तर बीसीसीआयकडून अर्शदीप सिंगला बक्षिसाच्या रूपाने मोठी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे 15 टक्के रक्कम कापली तरी फरक पडणार नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार