AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस चालकाच्या घरात सोनं अन् पैशांचा डोंगर, मशिनलाही पैसा मोजता येईना, आतापर्यंतची सर्वात मोठी रेड

पोलिसांनी एका बस चालकाच्या घरावर छापा टाकला, या घरात जे सापडलं ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला आहे, या चालकाच्या घरात एवढे पैसे आढळून आले आहेत की, त्यासाठी अनेक मशीन मागाव्या लागल्या.

बस चालकाच्या घरात सोनं अन् पैशांचा डोंगर, मशिनलाही पैसा मोजता येईना, आतापर्यंतची सर्वात मोठी रेड
पश्चिम बंगालमध्ये पोलिसांचा छापा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 8:11 PM
Share

एखाद्या चित्रपटाला शोभावा असाच हा प्रसंग आहे, तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की एखादं गुप्त भुयार असतं, आणि त्यामधून नोटांनी भरलेल्या पिशव्या, सोनं, चांदी बाहेर काढलं जातं, अशीच एक घटना घडली आहे. पोलिसांनी एका झोपडी सारख्या दिसणाऱ्या घरावर छापा टाकला आणि त्यानंतर त्यांच्या हाती या घरात जे काही लागलं ते पाहून त्यांना देखील घाम फुटला आहे. पोलिसांना छाप्यामध्ये एवढे पैसे सापडले की, पैसे मोजता -मोजता पाच मशीन्स बंद पडल्या, तरी देखील पूर्ण कॅश मोजता आलेली नाहीये, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल ज्या घरात ही एवढी कॅश सापडली, ते घर एका सामान्य ड्रायव्हरचं होतं. ही घटना पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात घडली आहे. एका माजी सरकारी बस ड्रायव्हरच्या घरावर पोलिसांनी छापा टाकाला, या छाप्यामध्ये या बस चालकाच्या घरातून तब्बल 20 कोटी रुपये रोख आणि 15 किलो सोन्याचे बिस्कीट पोलिसांनी जप्त केले आहेत.

35 गोण्यांमध्ये ठेवले होते पैसे

पोलिसांना या बस चालकाकडे पैसे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी या ड्रायव्हरच्या घरी छापा टाकला.मीनार मंडल असं या बस चालकाचं नाव आहे, पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांनी कल्पना देखील केली नव्हती की त्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा असेल. मीनार मंडल हा सरकारी बसचा ड्रायव्हर होता. तो याच परिसरात राहणाऱ्या दगडांच्या खाणीचा व्यापारी असणाऱ्या टुलू मंडलच्या पत्नीचा भाऊ आहे. पोलिसांनी छापा टाकला, समोर सोन आणि पैसा पाहून पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता, तब्बल 35 गोण्यांमध्ये हा पैसा भरून ठेवला होता.

पैसे मोजण्यासाठी 5 मशीन

पोलिसांनी तब्बल 5 मशीनच्या मदतीने हा पैसा मोजला अनेक तास पोलीस हा पैसा मोजतच होते, परंतु पैसे काही संपण्याचं नाव घेत नव्हते. पोलिसांनी ही संपत्ती जप्त करण्यासाठी 5 मोठे लोखंडाचे बॉक्स मागवले होते, यामध्ये ही संपत्ती भरण्यात आली. तसेच घटनास्थळावरून तब्बल 15 किलो सोनं देखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान हा पैसा खाण व्यापाराशी संबंधित असावा असा संशय पोलिसांना आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच