AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte: संजनाला अरुंधती घडवणार अद्दल; देशमुख कुटुंबीयांसमोर होणार तिला अटक?

अरुंधतीच्या व्यक्तीरेखेतील या बदलामुळे स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अधिक रंजक बनली आहे. या मालिकेत येणारे ट्विस्ट आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे एपिसोड्सची उत्सुकता चांगलीच ताणली जाते.

Aai Kuthe Kay Karte: संजनाला अरुंधती घडवणार अद्दल; देशमुख कुटुंबीयांसमोर होणार तिला अटक?
Rupali Bhosle and Madhurani PrabhulkarImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 5:24 PM
Share

आपल्याविरोधात काहीही झालं तरी मुकाट्याने ते सहन करणारी अरुंधती (Arundhati) आता पूर्णपणे बदलली आहे. आता ती स्वत:विरोधात आणि कुटुंबीयांविरोधात होणाऱ्या अन्यायाशी लढा देऊ शकते. अरुंधतीच्या व्यक्तीरेखेतील या बदलामुळे स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अधिक रंजक बनली आहे. या मालिकेत येणारे ट्विस्ट आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे एपिसोड्सची उत्सुकता चांगलीच ताणली जाते. घराघरात लोकप्रिय झालेल्या या मालिकेत पुन्हा एक मोठा ट्विस्ट येणार आहे. या ट्विस्टमुळे देशमुख कुटुंबात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरुंधतीविरोधात कटकारस्थान रचणं आता संजनाला महागात पडणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये संजनाला अटक झाल्याचं पहायला मिळत आहे. अटकेपासून वाचवण्यासाठी संजना घरातील प्रत्येकासाठी विनंती करते. मात्र यावेळी तिची कोणीच साथ देत नाही. संजनाच्या पाठिशी असणारा अनिरुद्धसुद्धा यावेळी तिची मदत करण्यास नकार देतो. संजनाने देशमुख कुटुंबाची संपत्ती आपल्या नावे करून घेतली आहे. त्यामुळे अनिरुद्धसह घरातील सर्वजण तिच्याविरोधात उभे राहिले आहेत. संजनाने फसवणूक करून देशमुखांचं घरसुद्धा स्वत:च्या नावे केलं आहे. त्यामुळे याविरोधात अरुंधती तिची तक्रार करते. त्यानंतर पोलीस तिला अटक करण्यासाठी येतात. आता पोलीस संजनाला अटक करणार का, संजनाला अटक झाल्यानंतर मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पहा व्हिडीओ-

सोशल मीडियावरील या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजना स्वप्न बघतेय, असं एका युजरने म्हटलंय. तर एका युजरने कांचन देशमुखांवर टीका केली आहे. हे खरंच मालिकेत घडायला हवं, असंही एका नेटकऱ्याने लिहिलंय. संजनाला घडलेली अद्दल पाहून नेटकऱ्यांनी आनंदसुद्धा व्यक्त केला आहे. आता संजना हे स्वप्न पाहतेय की अरुंधतीमुळे तिला खरंच अटक होणार, हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

हेही वाचा:

‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात अमोल कोल्हे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

KGF Chapter 2: अवघ्या तीन दिवसांत 150 कोटींकडे वाटचाल; वीकेंड कमाईचाही विक्रम मोडणार

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.