Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

काही महिन्यांपूर्वीच संजय दत्तला कर्करोगाचं (cancer) निदान झालं. त्यावर मात करत संजूबाबाने 'केजीएफ: चाप्टर 2'मधून (KGF: Chapter 2) दमदार पुनरागमन केलं. मात्र ज्यावेळी त्याला कर्करोगाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली होती.

Sanjay Dutt: पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव
Sanjay Dutt with family
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Apr 17, 2022 | 9:28 AM

अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) आयुष्यात आजवर अनेक चढउतार आले. अनेकदा तो स्वत: याविषयी विविध मुलाखतींमध्ये व्यक्त झाला. त्याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटातदेखील असे अनेक प्रसंग पहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वीच संजय दत्तला कर्करोगाचं (cancer) निदान झालं. त्यावर मात करत संजूबाबाने ‘केजीएफ: चाप्टर 2’मधून (KGF: Chapter 2) दमदार पुनरागमन केलं. मात्र ज्यावेळी त्याला कर्करोगाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली होती. पत्नी आणि मुलांचा विचार करत तो काही तास रडत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्त याविषयी व्यक्त झाला. लॉकडाउनदरम्यान संजयला कर्करोगाचं निदान झालं होतं.

एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “लॉकडाउनमधील तो सर्वसामान्य दिवस होता. जेव्हा मी पायऱ्या चढत होतो, तेव्हा मला श्वसनाचा त्रास होऊ लागला. अंघोळ करतानाही मला श्वास घेता येत नव्हतं. मला काय होतंय हेच कळत नव्हतं. अखेर मी माझ्या डॉक्टरांकडे गेलो. एक्स-रे काढला असता माझ्या फुफ्फुसांचा अर्ध्याहून अधिक भाग हा पाण्याने भरलेला होता, असं दिसलं. फुफ्फुसांमधील पाणी त्यांना बाहेर काढावं लागलं. मला टीबी (क्षयरोग) आहे असं वाटत होतं पण तो कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. मला कॅन्सर झालंय हे मला सांगणार कोण हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. त्यावेळी माझी मानसिक स्थिती अशी होती की मी कोणावरही हात उचलला असता. अखेर माझ्या बहिणीने मला सांगितलं. कॅन्सर झाल्याचं कळताच तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतात. अचानक सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तुम्ही करू लागता. माझ्या पत्नीच्या आणि मुलांच्या विचाराने मला रडू कोसळलं. दोन ते तीन तास मी रडत होतो. त्यातून सावरत मी उपचार अमेरिकेत करायचं ठरवलं. मात्र मला व्हिसा न मिळाल्याने अखेर इथेच उपचार घेईन असं मी ठरवलं.”

संजय दत्तची इन्स्टा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

कसा दिला कॅन्सरशी लढा?

अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी संजयकडे डॉक्टरांची शिफारस केली होती. “माझे केस गळतील, इतर काही शारीरिक बदल होतील. मी डॉक्टरांना म्हणालो, मेरेको कुछ नही होगा (मला काहीच होणार नाही). माझे केस गळणार नाही, मला उल्ट्या होणार नाहीत, मी बेडवर झोपून राहणार नाही. हे ऐकून डॉक्टरसुद्धा हसल्या. किमोथेरेपी झाल्यावर मी एक तास सायकलिंग केली. मी दररोज हे करू लागलो. प्रत्येक किमो सेशननंतर मी तासभर सायकलिंग करू लागलो. दुबईत किमोसाठी जायचो आणि तिथून बॅडमिंटन कोर्टमध्ये जाऊन दोन ते तीस तास बॅडमिंटन खेळायचो”, असं संजयने पुढे सांगितलं.

कॅन्सरशी लढण्यासाठी त्यालाच कसं आव्हान द्यावं लागतं आणि फिटनेसचा मार्ग कसा शोधावा लागतो याविषयी त्याने या मुलाखतीत सांगितलं. “मला जिमला जाऊन दोन महिने झाले आहेत, माझं वजन कमी झालंय. माझं स्वास्थ्य मला परत मिळतंय. तुम्हाला जुना संजय दत्त माहित आहेच, मला तो संजय दत्त पुन्हा व्हायचा आहे. आता मी हार मानणार नाही,” असं तो ठामपणे म्हणाला.

हेही वाचा:

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

The Kashmir Filesच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; आता बनवणार The Delhi Files

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें