KGF 2 : संजय दत्त खऱ्या आयुष्यातही योद्धा; शुटिंग पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाची संजूबाबावर स्तुतीसुमने

केजीएफ चॅप्टर 2 या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

KGF 2 : संजय दत्त खऱ्या आयुष्यातही योद्धा; शुटिंग पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाची संजूबाबावर स्तुतीसुमने
sanjay dutt
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 7:33 PM

मुंबई : दक्षिणेकडील चित्रपटप्रेमींसह देशभरातील चाहत्यांना KGF 2 चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशात आता चित्रपटाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ट्विटवरुन याबाबतची माहिती देताना सांगितले की, चित्रपटाचा क्लायमॅक्स नुकताच शूट करण्यात आला आहे. नील यांनी यावेळची काही छायाचित्रं ट्विटरवर शेअर केली आहेत. (Sanjay dutt KGF 2 climax Shooting complete director prashanth-neel shares photo)

प्रशांत नील यांनी ट्विट केलं आहे की, “खूप थकवणारं परंतु जबरदस्त शुटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. संजय दत्त खऱ्या आयुष्यातही एक योद्धा आहे. तसेच यशसोबत काम करणं म्हणजे ट्रिट असते. क्लायमॅक्सचं चित्रीकरण संपलं आहे. जगाने हा चित्रपट पाहावा, याची मी वाट पाहतोय”.

या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ‘असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगलेच सहज झाले होते. दोघांनीही शूटींग एन्जॉय केलं. दरम्यान, केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटाचा टीझर जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि त्याची टीम ८ जानेवारीला चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची योजना आखत आहेत. 8 जानेवारीचा दिवस खूप खास आहे कारण हा अभिनेता यशचा वाढदिवसही आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) कर्करोगावर मात करून पुन्हा एकदा काम सुरू केले होते. 10 डिसेंबरपासून त्याने केजीएफ 2 ची तयारी सुरू केली होती. केजीएफच्या निर्मात्यांनी संजय दत्तच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेत बॉडी डबल घेण्याचे सुचविले होते. मात्र याला संजय दत्तने नकार दिला आणि संजय दत्तने स्वत: अ‍ॅक्शन सीक्वेन्स केले. त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्येही त्याने असेच केले होते. आता तो आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे.

यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.

संबंधित बातम्या : 

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2020 मध्ये ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’ वेब सीरीज सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी ठरले!

Mithun Chakraborty : चित्रीकरण सुरू असताना मिथुन चक्रवतींची प्रकृती बिघडली

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

(Sanjay dutt KGF 2 climax Shooting complete director prashanth-neel shares photo)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.