AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 कोटींचे हिरे, 2 किलो सोनं अन्…; मुंबईत साकारली जगातील सर्वात महागडी साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल!

मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रोहित पिसाळ यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ३९ कोटी रुपयांची हिरेजडित सोन्याची साडी अर्पण करून अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. २ किलो सोने आणि दुर्मिळ हिऱ्यांपासून बनवलेली ही साडी नेमकी कशी आहे?

36 कोटींचे हिरे, 2 किलो सोनं अन्...; मुंबईत साकारली जगातील सर्वात महागडी साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल!
gold saree
| Updated on: Feb 11, 2026 | 12:50 PM
Share

कलेचा उपयोग जेव्हा महान व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी केला जातो, तेव्हा एक नवा इतिहास घडतो. मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि ज्वेलरी डिझायनर रोहित पिसाळ यांनी अशाच एका अनोख्या प्रयोगातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (७ फेब्रुवारी) रोहित पिसाळ यांनी त्यांना ३९ कोटी रुपयांची हिरेजडित सोन्याची साडी समर्पित केली आहे.

साडीची वैशिष्ट्ये आणि अफाट कलाकुसर

ही साडी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक कारागिरीचा एक दुर्मिळ संगम आहे. रोहित पिसाळ यांनी ही कलाकृती साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या साडीच्या निर्मितीमध्ये तब्बल २ किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. यात सोन्याच्या नाजूक नक्षीकामासोबतच साडीवर अत्यंत दुर्मिळ आणि महागडे हिरे जडवण्यात आले आहेत. ज्यामुळे तिची एकूण किंमत ३९ कोटी रुपये झाली आहे.

ही भव्य साडी पूर्ण करण्यासाठी पिसाळ यांना ९० दिवसांचा (३ महिने) कालावधी लागला. विशेष म्हणजे, साडीवर सोन्याचा मुलामा चढवण्याचे अत्यंत क्लिष्ट काम त्यांनी केवळ ४ तासांत यशस्वीरीत्या पूर्ण केले. मीडियामध्ये ‘गोल्डमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित पिसाळ यांनी ही साडी केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी बनवलेली नाही. त्यामागे एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी विचार आहे.

माता रमाबाईंनी अत्यंत गरिबीत दिवस काढले. आपल्या कुटुंबासाठी आणि बाबासाहेबांच्या ध्येयासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. ज्या माऊलीने आयुष्यभर फाटलेला पदर सावरून समाजाला आधार दिला, त्या पदराची किंमत जगातील कोणत्याही हिऱ्यापेक्षा जास्त आहे. आजच्या पिढीला त्यांचा हा त्याग आणि संघर्ष कळावा, म्हणून मी हा सोन्या-हिऱ्यांचा पदर त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण केला आहे, असे रोहित पिसाळ यांनी सांगितले.

कोण आहेत रोहित पिसाळ?

  • रोहित पिसाळ हे मुंबईतील एक मोठे व्यावसायिक आहेत. ते सोने आणि हिऱ्यांपासून जागतिक दर्जाच्या कलाकृती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
  • यापूर्वी त्यांनी १० कोटी रुपयांचे सोन्याचे सफरचंद (Golden Apple) तयार केले होते. या कलाकृतीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली होती. ते थायलंडच्या राजवाड्यात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
  • ते केवळ दागिने बनवत नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या विषयांवर विशेष कलाकृती तयार करून त्यांना जागतिक स्तरावर नेण्याचे काम करतात.
  • रोहित पिसाळ यांनी माता रमाबाईंच्या चरणी अर्पण केलेली ही ३९ कोटींची सुवर्ण साडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पिसाळ यांच्या या आगळ्यावेगळ्या आदरांजलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला