Mithun Chakraborty : चित्रीकरण सुरू असताना मिथुन चक्रवतींची प्रकृती बिघडली

दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघाडली असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचली आहे.(Mithun Chakraborty fell ill while filming)

  • Publish Date - 12:34 pm, Sun, 20 December 20
Mithun Chakraborty : चित्रीकरण सुरू असताना मिथुन चक्रवतींची प्रकृती बिघडली

मुंबई : बॉलिवूडमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघाडली असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचली आहे.अभिनेते मिथुन चक्रवर्ती सध्या उत्तराखंड येथील मसूरीमध्ये आगामी वेब सिरिज ‘कश्मीर फाइल्स’चं चित्रीकरण करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मिथुन यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झालाय, रिपोर्ट्स नुसार त्यांना उलट्या झाल्या आणि त्यांचं पोट खराब झालं होतं. त्यांची तब्येत ढासळल्यानंतर लगेचच डॉक्टरांची टीम त्यांच्या चेकअपसाठी हॉटेलमध्ये पोहोचली. सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचं कळतय. मात्र डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मिथुन यांना चित्रीकरणासाठी लँडोरला जायचं होतं
मिथुन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लँडोर येथे रवाना होणार होते. मात्र हॉटेल सोडण्यापूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला, त्यामुळे त्यांच्या सीनचं शूटिंग रद्द करण्यात आलं.

आपल्या नृत्यानं आणि अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारे मिथुन चक्रवर्ती एका वर्षानंतर चित्रीकरणासाठी पुन्हा परतले आहे. यापूर्वी ते देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यावर बनवलेल्या ‘द ताश्कंत फाइल्स’ चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी खूप महत्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त श्वेता बसु प्रसाद, नसीरुद्दीन शाह, आसिफ बसरा, पल्लवी जोशी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI