Devendra Fadnavis | आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार, कायद्यात तरतूद करण्यासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सोशल मीडिया आणि बदनामीच्या वाढत्या समस्येवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सोशल मीडिया आणि बदनामीच्या वाढत्या समस्येवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे, विशेषतः महिलांना याचा त्रास जास्त सहन करावा लागतो.” यासंदर्भात कायद्यात काही बदल किंवा तरतूद करता येईल का?, हे पाहण्यासाठी राज्याचे डीजी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कमिटीच्या शिफारशींनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील सोशल मीडिया आणि ऑनलाइन बदनामीच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी ही पावले महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
Published on: Mar 10, 2026 01:22 PM
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू

