AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात राहतात सर्वात कमी उंचीचे स्त्री-पुरुष; बुटक्या लोकांचा हा प्रदेश कोणता?

Shortest People In World: आपल्या प्रत्येकाच्या उंचीत फरक दिसतो. काही जण खूप उंच तर काही जण प्रमाणापेक्षा कमी उंचीचे असतात. तर काही जण सरासरी उंचीचे असतात. घरातही उंचीतील हा फरक प्रकर्षाने दिसून येतो. जगात या देशात कमी उंचीची स्त्री-पुरूष आढळून येतात.

या देशात राहतात सर्वात कमी उंचीचे स्त्री-पुरुष; बुटक्या लोकांचा हा प्रदेश कोणता?
कमी उंचीची माणसं, फाईल चित्रंImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 10, 2026 | 4:21 PM
Share

Shortest People In World: काही संशोधन आणि वृत्तानुसार, दक्षिण पूर्वेतील एक बेट तिमोर लेस्ते येथील स्त्री-पुरूषांची उंची ही सरासरीपेक्षा कमी आढळते. ती जगातील मानवाच्या उंचीपेक्षा कमी आहे. अर्थात जेनेटिक्स, पोषण आहार आणि कोणत्या स्थितीत ही माणसं राहतात त्याआधारे प्रत्येक माणसाच्या उंचीत कमी अधिक प्रमाण दिसून येते. पण तिमोर लेस्ते येथील लोकसंख्या जागतिक प्रमाणाच्या तुलनेत कमी उंचीची आहे. त्यामागे काय कारणं आहेत, यावर संशोधन सुरू आहे.

तिमोर लेस्तेमध्ये कमी उंचीची माणसं

तिमोर लेस्ते या बेटावरील स्त्री आणि पुरूषांची उंची अत्यंत कमी आहे. सरासरी जी उंची आहे, त्यापेक्षा येथील माणसाची उंची कमी आढळून आली. पुरुषांची सरासरी उंची जवळपास 159.8 सेंटिमीटर आहे. तर स्त्रीयांची उंची जवळपास 5 फुट 3 इंच आहे. यासह महिलांची सरासरी उंची जवळपास 151.2 सेंटिमीटर म्हणजे जवळपास 4 फुट 11.5 इंच आहे. हा आकडा जागतिक उंचीच्या सरासरीपेक्षा कमी मानल्या जातो.

कमी उंचीचा दुसरा देश कोणता?

तिमोर लेस्ते हा काही कमी उंचीचा एकमेव देश नाही. जागतिक आकडेवारीनुसार, इतर देशातील स्त्री-पुरुषाची उंची कमी आहे. लाओस येथील पुरूषाची उंची जवळपास 160.5 सेंटिमीटर आहे. तर महिलांची सरासरी उंची 151.3 सेंटिमीटर आहे. तर मेडागास्कर या देशातील पुरुषांची सरासरी उंची जवळपास 161.5 सेंटिमीटर आणि महिलांची उंची जवळपास 151.2 सेंटिमीटर असते.

या देशाशिवाय ग्वाटेमाला येथील महिला या जगात कमी उंचीच्या मानल्या जातात. त्यांची सरासरी उंची जवळपास 149.4 सेंटिमीटर असते. तर फिलिपाईन्समधील पुरुषांची सरासरी उंची जवळपास 163.2 सेंटिमीटर आणि महिलांची उंची सरासरी 149.6 सेंटिमीटर इतकी असते.

उंची इतकी कमी का?

तज्ज्ञांच्या मते, या देशात सरासरी उंची कमी होण्याचे प्रमुख कारण हे अनुवांशिक मानले जाते. तर योग्य पोषण आहार न मिळणे, काही कमी पोषक तत्व न मिळणए यामुळे एखाद्या भागातील स्त्री आणि पुरुषांचा शारिरीक विकास होत नाही. त्या भागातील आरोग्य आणि विकास यामुळे पण मनुष्याची उंची खुंटते असे मानले जाते.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?