AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG: घरगुती गॅसचा काळाबाजार? सिलेंडरसाठी जादा दाम? इथं करा तक्रार

LPG Cylinder Complaint: गॅस डीलर जर विहित पद्धतीने तुम्हाला गॅस देत नसेल, अथवा गॅस एजन्सीचे कर्मचारी जादा पैसे मागत असतील तर तुम्हाला या मनमानीविरोधात आवाज उठवता येतो. याविरोधात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यापासून ते कंपनीकडे तक्रार करता येते. काय आहे ती प्रक्रिया?

LPG: घरगुती गॅसचा काळाबाजार? सिलेंडरसाठी जादा दाम? इथं करा तक्रार
एलपीजी गॅस सिलेंडर तक्रारImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 10, 2026 | 3:39 PM
Share

Gas Dealer Complaint: एलपीजी सिलेंडर हा आता सगळ्याच घरात दिसतो. ती आता गरज झाली आहे. पण अनेकदा डीलर अथवा गॅस एजन्सीचे कर्मचारी मनमानी करतात. ते ग्राहकांकडून अधिक पैसे मागतात. वेगवेगळे चार्जेस लावतात. त्यांच्या या कारभारामुळे ग्राहक त्रस्त होतो. आखाती युद्धामुळे नैसर्गिक गॅसचा तुटवडा असल्याचे वृत्त येताच अनेक ठिकाणी ग्राहकांच्या गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली, तुटवडा असल्याचे कारण पुढे करत ग्राहकांकडून 100 ते 500 रुपये अतिरिक्त वसूल करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. अशावेळी त्यांना या मनमानीला चाप लावता येतो. त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तेल कंपन्यांकडे तक्रार नोंदवता येते.

कंपन्यांनी सुद्धा अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जलद आणि सोपी पद्धत अंगिकारली आहे. त्यामुळे चुकीची वसुली आणि गैरवर्तन तसेच मनमानीला चाप बसला आहे. केंद्र सरकारने देशात अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा लागू केला आहे. जाणून घ्या याविषयीची प्रक्रिया काय आहे ते?

तक्रार कुठे नोंदवता येणार?

जर गॅस डीलर अतिरिक्त पैसे घेत असेल अथवा तो गॅस सिलेंडर देण्यास नकार देत असेल, तो मनमानी करत असेल तर त्याविरोधात दाद मागता येते. त्यासाठी सर्वात अगोदर कंपनीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. इंडेन, एचपी, भारत या सरकारी कंपन्यांच्या अधिकृत पोर्टलवर ग्राहकांना तक्रार करता येईल. तुम्ही ज्या कंपनीचे ग्राहक असाल, त्या कंपनीच्या पोर्टलवर तक्रार कक्षाकडे दाद मागता येईल. साईटवर त्यासाठी पर्याय देण्यात आला आहे.

या साईटवर ग्राहकांना रिफिल पुरवठा, सिलेंडरमध्ये कमी गॅस असल्याची, अतिरिक्त पैसे वसूल केल्याची, सेवेत त्रुटी केल्याची, ऑनलाईन पेमेंटशी तक्रार करता येते. तु्म्ही जेव्हा योग्य पर्याय निवडता आणि सबमिट बटण दाबता, तेव्हा ही तक्रार कंपनीकडे पोहचते आणि कारवाई सुरू होते. तसेच या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळेत. ग्राहक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे सुद्धा तक्रार नोंदवू शकतात. हा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत पुरवठा विभागाचा प्रमुख असतो.

ही माहिती विसरू नका

ऑनलाईन तक्रार नोंदवताना ग्राहकाने कंपनीला अत्यावश्यक माहिती पुरवणे गरजेचे आहे. त्यासाठी LPG ID, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वा ग्राहक क्रमांक ही माहिती समोर ठेवावी लागेल. त्याआधारे कंपनी ग्राहकांची ओळख पटवेल. त्याआधारे कंपनी पुढील कारवाई करू शकेल. तक्रार केल्यानंतर तुम्हाला तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती घेता येते.

Follow Us
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर