AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या मृत्यूनंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण काय? रिंकु सिंहने सांगितलं खरं काय ते

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर रिंकु सिंहने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या स्पर्धेदरम्यान त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण मनावर दगड ठेवून या स्पर्धेत खेळण्यास परतला होता.

वडिलांच्या मृत्यूनंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण काय? रिंकु सिंहने सांगितलं खरं काय ते
वडिलांच्या मृत्यूनंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण काय? रिंकु सिंहने सांगितलं खरं काय तेImage Credit source: PTI
| Updated on: Mar 10, 2026 | 4:33 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिंकु सिंह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. त्यामुळे स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रिंकु सिंहचे वडील कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. रिंकु सिंहला हा धक्का स्पर्धा सुरू असताना बसला होता. रिंकु तात्काळ घरी परतला आणि वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. त्यानंतर रिंकुने घरी शोक व्यक्त करत न बसता टीम इंडियाच्या ताफ्यात रूजू झाला. भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं. त्यानंतर रिंकु सिंहने वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने वडिलांचं छत्र हरपल्याने काय होणार याची कल्पना सांगितली आहे. तसेच वडिलांच्या निधनानंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर रिंकु सिंहने इंस्टाग्राम पोस्टमध्ये वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिलं की, तुमच्या बोलल्याशिवाय इतके दिवस कधीच काढले नाहीत. मला माहिती नाही की तुमच्याशिवाय पुढचं जीवन कसं जाईल. मला प्रत्येक पावलावर तुमची गरज भासणार आहे. रिंकु सिंहने पुढे लिहिलं की, ‘तुम्हीच शिकवलं होतं की कर्तव्य सर्वात पुढे असतं. त्यामुळे मैदानात तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण असं वाटतं की कदाचित तुम्ही माझ्या जवळ असता. प्रत्येक छोट्या आनंदात तुमची उणीव भासणार आहे. तुमची उणीव मला कायम भासत राहील पापा.. खूपच जास्त’

रिंकु सिंहची बॅट काही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चालली नाही. त्याला 5 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण त्याने 8 च्या सरासरीने फक्त 29 धावा केल्या. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याता आला. संजू सॅमसनला संघात जागा मिळाली. संजू सॅमसनने संधीचं सोनं केलं. दरम्यान, रिंकु सिंहचं टी20 संघातील स्थान कायम राहिल की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण आयपीएलमधील कामगिरीवर आता पुढचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. रिंकु सिंह आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार