AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? रवींद्र जडेजाने स्पष्टच सांगितलं की…

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. दिग्गज गोलंदाजांचा सामना वैभव निर्भयपणे करतो. त्यामुळे त्याला कोणाची भीती वाटते की नाही? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर रवींद्र जडेजाने दिलं आहे.

वैभव सूर्यवंशीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? रवींद्र जडेजाने स्पष्टच सांगितलं की...
वैभव सूर्यवंशीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? रवींद्र जडेजाने स्पष्टच सांगितलं की...Image Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2026 | 6:14 PM
Share

Ravindra Jadeja- Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 स्पर्धेनंतर रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वनडे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये रवींद्र जडेजा खेळतो. पण वनडे संघात त्याची जागा काही होताना दिसत नाही. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटवरच त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर अवलंबून असल्याचं दिसत आहे. असं असताना श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी रवींद्र जडेजाची संघात एन्ट्री झाली आहे. रवींद्र जडेजा फिट अँड फाईन असून श्रीलंकेत अष्टपैलू कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सशी निगडीत त्याचा आणि वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रवींद्र जडेजा आणि वैभव सूर्यवंशी हे दोन्ही खेळाडू रॅपिड फायर राउंडमध्ये व्यक्त झाले. या दरम्यान एक प्रश्न दोन्ही खेळाडूंना झाला. त्यात कोणत्या गोलंदाजाचा सामना करताना भीती वाटते? हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा दोघांनी यावर उत्तरं दिली.

रवींद्र जडेजा आणि वैभव सूर्यवंशी काय म्हणाले?

आयपीएल स्पर्धेसंदर्भात हा प्रश्न होता. या प्रश्नावर रवींद्र जडेजाने आपल्याच संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचं नाव घेतलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोलंदाजांचं नाव विचारलं, तेव्हा रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा जोफ्रा आर्चरचं नाव घेतलं. रवींद्र जडेजानंतर हाच प्रश्न वैभव सूर्यवंशीला विचारला गेला. तेव्हा त्याने उत्तर दिलं की, मला कोणाचीच भीती वाटत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून रवींद्र जडेजाने तात्काळ मजेशीर अंदाजात आपलं म्हणणं मांडलं. रवींद्र जडेजा म्हणाला की असं कोणी अजून मार्केटमध्ये आलेलं नाही. रॅपिड फायर फेरीत रवींद्र जडेजा आणि वैभव सूर्यवंशी यांना आणखी काही प्रश्न विचारले गेले. कशी फलंदाजी करायला आवडते? यावर वैभवने झटकन उत्तर दिलं आणि म्हणाला निर्भयपणे… रवींद्र जडेजाचं उत्तर स्थितीनुसार आणि परिपक्वतेने असं होतं.

वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीला सुरूवात झाली. इंग्लंड मालिका काही खास गेली नाही. या मालिकेत जोफ्रा आर्चरने त्याला दोन वेळा बाद केले. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याचा आक्रमक बाणा दिसला. त्याने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वाधिक 151 धावा केल्या. यामुळे शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार आणि मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती