AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits: फक्त गार्निशिंगसाठीच नाही, आरोग्यासाठीही गुणकारी आहे कोथिंबीर, जाणून घ्या फायदे

Coriander Leaves Health Benefits: जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. मात्र कोथिंबीर केवळ गार्निशिंगपुरती मर्यादित नसून आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. कोथिंबिर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात जाणून घ्या

Health Benefits: फक्त गार्निशिंगसाठीच नाही, आरोग्यासाठीही गुणकारी आहे कोथिंबीर, जाणून घ्या फायदे
| Edited By: | Updated on: Oct 31, 2026 | 7:35 AM
Share

आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणारी कोथिंबीर अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्याचे काम करते. हिरवी चटणी, भाजी, आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये कोथिंबिरीचा आवर्जून वापर केला जातो. मात्र, या हिरव्यागार पानांमध्ये केवळ चव वाढवण्याचेच नव्हे, तर शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटकही लपलेले आहेत. कोथिंबिरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे घटक आढळतात. त्यामुळे पचन, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, किडनीचे आरोग्य आणि वजन नियंत्रण अशा विविध बाबींमध्ये कोथिंबिरीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोथिंबीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

मधुमेह मधुमेह असलेल्या लोकांनी कोथिंबीरचे नियमित सेवन केल्यास रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. संशोधनानुसार कोथिंबिरच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी म्हणजेच रक्तातील साखर कमी करणारे गुणधर्म असतात. याशिवाय कोथिंबीरच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये इन्सुलिनचा प्रवाह वाढवता येतो. कारण त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात.

पचनशक्ती कोथिंबीरच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होऊन पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. पोटदुखी झाल्यास दोन चमचे कोथिंबीर अर्धा ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोथिंबीरीचे सेवन करता येते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोथिंबीरीच्या पानांच्या इथेनॉल अर्कामध्ये अनेक फ्लेव्होनॉइड संयुगे असतात. ही संयुगे इम्युनोमोड्युलेटर म्हणून काम करतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते.

अॅनिमिया तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर कोथिंबीर तुमची समस्या दूर करू शकते. कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्याने शरीरातील रक्त वाढून एनिमिया दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोथिंबीर अँटी-ऑक्सिडंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन ए आणि सी यांनी समृद्ध असते आणि कॅन्सरपासूनही संरक्षण करते.

वजन कमी करते कोथिंबीर वजन कमी करण्यात मदत करू शकते. हा उपाय करण्यासाठी काही कोथिंबीर पाण्यात चांगले उकळून घ्या. नंतर पाणी कोमट झाल्यावर ते गाळून प्या. कोथिंबीरपासून बनवलेले हे ड्रिंक प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. एनीसीबीआयच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कोथिंबीरीत क्वेरसेटिन नावाचा फ्लेव्होनॉइड आढळतो. क्वेरसेटिनमध्ये अँटी ओबेसिटी गुणधर्म आहेत, जे शरीराचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

उच्च रक्तदाब कोथिंबीरीच्या पानांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. (डिस्क्लेमर: बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान