AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेनंतर मोठा उलटफेर; माजी मंत्री भाजपची साथ सोडणार, राजकीय समीकरण बदलणार

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मोठा उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.

विधानपरिषदेनंतर मोठा उलटफेर; माजी मंत्री भाजपची साथ सोडणार, राजकीय समीकरण बदलणार
BJP news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 7:45 AM
Share

देशातील विविध राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. विधानपरिषदेच्या निकालानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे  लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशातही आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री साहब सैनी यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. साहब सैनी हे शेकडो समर्थकांसहित अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. साहब सिंह सैनी यांच्या निर्णयाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

साहब सिंह सैनी यांच्या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील नकुड विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होते. पक्ष प्रवेशानंतर नकुड विधानसभा मतदारसंघात साहब सिंह सैनी यांना तिकीट मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. खरंतर नकुड विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून अनेक दावेदार आहेत. त्यात अद्याप समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या जागावाटपात नकुडची जागा कोणाच्या पदरात पडणार, हे देखील अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे येत्या दिवसांत नकुड विधानसभा मतदारसंघातील घडामोडींकडे राजकीय नेते लक्ष ठेवून असणार आहेत.

तीन दिवसाआधी श्रावस्ती जिल्हा पंचायत सदस्य देव प्रताप सिंह यांनी समाजवाद पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत उद्योजक तेज प्रताप सिंह यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. देव प्रताप सिंह यांच्यासोबत शेकडो समर्थकांनी लखनौ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेस करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या पक्षप्रवेशाने श्रावस्तीमधील राजकीय समीकरण बदलल्याचे दिसून आले. देव प्रताप सिंह यांनी अखिलेश यादव यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून समाजवादी पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीआधी बरेलीमध्येही मोठा उलटफेर झालाय. भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप आणि त्यांची मुलगी कीर्ति कश्यप यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. दोन्ही बाप-लेकीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान