AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅशटॅग लायकी वापरत निलेश राणेंना जोरदार टोला, नवनाथ बन यांनी थेट फोटोच केले शेअर..

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा धक्का भाजपाला बसला. महायुतीचा फक्त दोन जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडी तब्बल 3 जागांवर विजयी झाली. त्यानंतर महायुतीचे नेते मोठे आरोप करताना दिसत आहेत.

हॅशटॅग लायकी वापरत निलेश राणेंना जोरदार टोला, नवनाथ बन यांनी थेट फोटोच केले शेअर..
Navnath Ban
| Updated on: Oct 31, 2026 | 7:46 AM
Share

राजकारणात प्रत्येक टीकेला शब्दांनीच उत्तर द्यावे लागते असे नाही, कधी एक फोटो आणि त्यासोबतचे मोजके शब्दही बरंच काही सांगून जातात. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीनंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. दोन्ही बाजूंनी सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. नवनाथ बन थेट शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप करत आम्हाला शिंदेंच्या पक्षाने निवडणुकीत सहकार्य केले नसल्याचे म्हटले. दोन्ही पक्षातील वाद वाढत आहे. नवनाथ बन आणि रविंद्र धंगेकर एकमेकांवर टीका करत आहेत. दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनीही एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर नवनाथ बन यांच्यावर टीका केली. यादरम्यान निलेश राणे यांना उत्तर देत नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी नारायण राणे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले.

हे फोटो शेअर करत त्यांना हॅशटॅग जबरदस्त दिला. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर टीका करत त्यांची लायकी काढल्यानंतर बन यांनी थेट शब्दयुद्धात न उतरता खास शैलीत त्यांना उत्तर दिले. नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी 2009 साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता.

मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो, अशा शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी बन यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी निलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एका पत्रकार परिषदेमधील फोटो शेअर केले. यातील एका फोटोत दोघे एकमेकांना बोलताना दिसत आहेत.

या फोटोत बन हे नारायण राणे यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब निलेश राणे यांनी वापरलेल्या ज्युनिअर या शब्दालाच आपल्या उत्तराचे माध्यम बनवले. विशेष म्हणजे निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी कोणतीही आक्रमक भाषा वापरली नाही, कोणताही वैयक्तिक आरोप केला नाही.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान