Anupam Kher | या कारणामुळे अनुपम खेर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी चक्क पोहचले रिक्षाने

| Updated on: Feb 06, 2023 | 6:18 PM

अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांनी खास मेहनत घेतलीये.

Anupam Kher | या कारणामुळे अनुपम खेर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी चक्क पोहचले रिक्षाने
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही दिवसांपूर्वी बिग बाॅस १६ च्या घरामध्ये हजेरी लावली होती. यावेळी अनुपम खेर हे बिग बाॅसच्या घरातील सदस्यांसोबत मस्ती करताना दिसले. यावेळी त्यांनी घरातील सदस्यांना एक खास टास्क दिला होता. बिग बाॅसच्या घरात अनुपम खेर हे त्यांच्या आगामी शिव शास्त्री बालबोआ (Shiv shastri balboa) या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांनी खास मेहनत घेतलीये. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर आणि आमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ऊंचाईच्या अगोदर रिलीज झालेले चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. यामध्ये कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. अनुपम खेर हे सध्या त्यांच्या आगामी शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये बिझी आहेत.

सोशल मीडियावर नुकताच अनुपम खेर यांनी एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर हे रिक्षामधून उतरताना दिसत आहेत. अनुपम खेर दिल्लीमध्ये रिक्षाने का प्रवास करत आहेत? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओसोबतच अनुपम खेर यांनी रिक्षाने फिरण्याचे कारणही सांगून टाकले आहे. रविवारी दिल्लीत अनुपम खेर यांच्या शिव शास्त्री बलबोआ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजन करण्यात आले होते. मात्र, या स्क्रिनिंगला पोहचण्यासाठी निघालेल्या अनुपम खेर यांना ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी सोडले.

ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी सोडल्याने अनुपम खेर यांना रिक्षाने यावे लागले. अनुपम खेर यांना वेळेवर कार्यक्रमाला पोहचायचे असल्याने त्यांनी रिक्षाने जाणे पसंत केले. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर हे कॅनॉट प्लेस येथे रिक्षामधून उतरल्याचे दिसत आहे.

शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटामध्ये अनुपम खेर हे एका पहलवानाच्या भूमिकेत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देऊन बाॅडी तयार केलीये. काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी म्हटले होते की, शिव शास्त्री बालबोआ चित्रपटाची स्टोरी ही एक साधारण व्यक्तीची असाधारण गोष्टीची आहे. हा चित्रपट बघितल्यावर तुम्ही फक्त हसणार नाही तर आत्मविश्वासाची एक सुंदर भावनाही जागृत होईल…