आलिशान गाड्या… 70 कोटींचा मढ आयलंडमधील बंगला अन् 235 कोटींची संपत्ती, अर्चना पूरण सिंह जगते राणीसारखं आयुष्य

Archana Puran Singh Bungalow : आज आपण अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि त्यांचे पती परमीत सेठी यांच्या मुंबईतील मढ आयलंड येथील प्रशस्त बंगल्याची आणि अर्चना यांच्या राणीसारख्या आयुष्याची माहिती जाणून घेणार आहोत.

आलिशान गाड्या... 70 कोटींचा मढ आयलंडमधील बंगला अन् 235 कोटींची संपत्ती, अर्चना पूरण सिंह जगते राणीसारखं आयुष्य
archana puran singh bunglow
Image Credit source: Google
| Updated on: Jul 27, 2026 | 12:01 AM

बॉलिवू़डचे कलाकार आणि त्यांची लाईफस्टाईल ही नेहमी चर्चेचा विषय असते. संगमरवरी फरशा आणि झुंबरांनी सजलेली अनेक सेलिब्रिटींची घरे आपण पाहतो. मात्र काही घरे अशी असतात जी केवळ ऐश्वर्याची नव्हे, तर आठवणी, संस्कार दर्शवतात. आज आपण अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि त्यांचे पती परमीत सेठी यांच्या मुंबईतील मढ आयलंड येथील प्रशस्त बंगल्याची आणि अर्चना यांच्या राणीसारख्या आयुष्याची माहिती जाणून घेणार आहोत.

अर्चना पूरण सिंह यांची लाईफस्टाईल यूट्यूब व्ह्लॉग्समधून चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्यात संगीत, कला, आठवणी, निसर्ग आणि अनेक दशकांचा कौटुंबिक इतिहास दडलेला आहे. मुंबईतील आलिशान बंगल्याव्यतिरिक्त अर्चना यांच्याकडे डेहराडूनमधील 75 वर्षे जुने पिढीजात घर, पूर्वजांची शेती, लक्झरी कार कलेक्शन आणि कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यामुळे त्या भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.

मढ आयलंडमधील बंगला इतका खास का?

बॉलिवूड कलाकार बांद्रा किंवा जुहू परिसरात राहणे पसंत करतात. मात्र, अर्चना आणि परमीत यांनी शांत वातावरणासाठी मढ आयलंडची निवड केली. स्पॅनिश शैलीतील त्यांच्या बंगल्याची सध्याची किंमत सुमारे 70 कोटी रुपये आहे. अर्चना यांनी अनेक व्ह्लॉगमध्ये सांगितले आहे की, मढ आयलंडमध्ये राहायला आल्यानंतर त्यांना पुन्हा निसर्गाशी जोडले गेल्यासारखे वाटले. त्यांच्या मते, या शांत वातावरणामुळे त्यांच्या कुटुंबाला अधिक आनंदाने आणि मोकळेपणाने जगता आले.

या बंगल्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो एकाच वेळी बांधलेला नाही. अर्चना यांनी सांगितले की, त्यांनी आणि परमीत यांनी हळूहळू शेजारची घरे विकत घेतली. त्यानंतर हा बंगला उभारण्यात आला. या घरात प्रवेश करताच वेगळाच फील येतो. क्रीम रंगाच्या भिंती, बेज छत, लाकडी फर्निचर, जुन्या शैलीतील लटकते कंदील आणि घरभर ठेवलेली हिरवीगार झाडे घराला वेगळं बनवतात.

प्रशस्त हॉलमध्ये अनेक वर्षांपासून वाढदिवस, सण-समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रम होत आले आहेत. त्यांच्या मुलांनी याच हॉलमध्ये अनेक संगीत मैफिली आयोजित केल्या आहेत. हॉलमधील उंच लाकडी स्टेज आहे. घरातील एका भागात कुटुंबाचे फोटो, जुन्या घड्याळांचा संग्रह, दिवे आणि सजावटीच्या वस्तूंमुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळतो. मोठ्या पांढऱ्या पडद्यांमधून येणारा नैसर्गिक प्रकाश या भागाला अधिक आकर्षक बनवतो.

बेडरूम आणि मुलांच्या खोल्या

अर्चना आणि परमीत यांची बेडरूम आकर्षक आणि प्रशस्त आहे. भिंतींवरील लाकडी पॅनेलिंग, जमिनीपासून छतापर्यंत असलेली मोठी काच, मुंबईचे सुंदर दृश्य आणि चार खांबांचा लाकडी पलंग हे या खोलीचे मुख्य आकर्षण आहे. अर्चना यांनी त्यांच्या खास मेकअप आणि व्हॅनिटी स्पेसचीही झलक दाखवली आहे. त्यांचा मोठा मुलगा आर्यमानच्या खोलीत गिटार आणि संगीताशी संबंधित वस्तू आहेत, तर आयुष्मानच्या खोलीत मोठे स्कायलाइट असून त्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो.

या बंगल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे गार्डन. मोठे हिरवेगार लॉन, फुलझाडे, जुनी झाडे, बाग आणि बसण्यासाठी सुंदर पेर्गोला येथे आहे. मलाड दगडांनी तयार केलेल्या पायवाटा या बागेत आहेत. याशिवाय, येथे किचन गार्डनही तयार करण्यात आले आहे, जिथे ताजी फळे-भाज्या पिकवल्या जातात. यामुळे हा बंगला मुंबईतील घरापेक्षा एखाद्या निसर्गरम्य फार्महाऊससारखा वाटतो.

डेहराडूनमध्ये 75 वर्षे जुने घर

मढ आयलंडमधील बंगला अर्चना यांच्या वर्तमान आयुष्याचे प्रतीक असला, तरी डेहराडूनमधील 75 वर्षे जुने घर त्यांच्या बालपणाच्या आठवणी जपून ठेवते. हे घर त्यांच्या वडिलांनी, प्रसिद्ध फौजदारी वकील पूरण सिंह यांनी बांधले होते. एका व्ह्लॉगमध्ये अर्चना यांनी सांगितले की, हेच ते घर आहे जिथे त्यांनी बालपण घालवले आणि आयुष्यातील अनेक सुंदर क्षण अनुभवले. याघरात प्रवेश करताच पुस्तकांनी भरलेला लॉबी परिसर दिसतो, जो ग्रंथालय आणि बैठक खोली म्हणून वापरला जातो. या घराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे काश्मिरी कारागिरांनी कोरलेले अप्रतिम लाकडी छत. अर्चना यांच्या वडिलांनी खास डेहराडूनमध्ये काश्मिरी कारागीर बोलावून हे काम करून घेतले होते. आजही घरातील बहुतांश फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू 50 वर्षांहून अधिक जुन्या आहेत.

पूर्वजांचे गाव आणि शेती

अर्चना यांनी त्यांच्या पूर्वजांचे गाव दुधलीलाही भेट दिली. येथे त्यांच्या कुटुंबाचे जवळपास 200 वर्षे जुने पिढीजात घर होते. त्याच जागेवर त्यांच्या वडिलांनी शाळा सुरू केली असून ती आजही सुरू आहे. आजही त्या परिसरातील शेती अर्चना, त्यांचे भाऊ आणि चुलत भावंडांच्या संयुक्त मालकीची आहे. या शेतातून हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगांचे सुंदर दृश्य दिसते.

अर्चना यांची एकूण संपत्ती किती?

चित्रपट, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांमध्ये जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीनंतर अर्चना पूरण सिंह यांनी मोठी आर्थिक संपत्ती उभी केली आहे. विविध वृत्तांनुसार, 2026 मध्ये त्यांची एकूण संपत्ती सुमारे 235 कोटी रुपये आहे. त्यांना चित्रपट, टीव्ही शो, जाहिराती, यूट्यूबमधून पैसे मिळतात. त्या कपिल शर्माच्या शोचा भाग आहेत. प्रत्येक भागासाठी त्यांना 10 ते 12 लाख रुपये मानधन मिळते.

अर्चना यांच्या लक्झरी कार

अर्चना यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. यात Mercedes-Benz E-Class, Audi A8, BMW X5, Jaguar F-Pace, Range Rover Evoque, Porsche Panamera यांचा समावेश आहे. एकंदरीत पाहता अर्चना पूरण सिंह या राणीसारखे आलिशान आयुष्य जगतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us